विद्युत वाहकता सेन्सर डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलगSoil Management: मातीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे उपकरण आहे. मातीतील पाण्यामध्ये विरघळलेल्या क्षारांमुळे विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता वाढते. हीच क्षमता विद्युत वाहकता म्हणून मोजली जाते. विद्युत वाहकता सामान्यतः डेसिसीमेन्स प्रति मीटर (dS/m) या एककांमध्ये मोजले जाते. विद्युत वाहकता मूल्य जितके जास्त, तितके मातीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण अधिक असल्याचे दर्शवते. .विद्युत वाहकता सेन्सर दोन इलेक्ट्रोडच्या साह्याने विद्युत प्रवाह पाठवतो आणि मातीतील आयनांच्या प्रमाणानुसार विद्युत वाहकता मोजतो. सोडिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्लोराइड, सल्फेट आणि इतर विद्राव्य क्षारांचे प्रमाण वाढल्यास विद्युत वाहकता मूल्य वाढते. ही माहिती डिजिटल स्वरूपात संगणक, डेटा लॉगर किंवा मोबाइल अॅपवर उपलब्ध होते..Soil Testing Technology: सेन्सर-आधारित मृदा आरोग्य परीक्षण.उपयोगक्षारयुक्त आणि चोपण जमिनीचे गुणधर्म समजतात.सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करता येते.मातीतील क्षारतेतील बदलांचे नियमित निरीक्षण करता येते.क्षार व्यवस्थापन, मृदा सुधारणेचे नियोजन करता येते.सिंचन आणि निचरा व्यवस्थापनाचे निर्णय घेता येतात..फायदेक्षारतेची समस्या सुरुवातीच्या अवस्थेतच ओळखता येते.पिकांवर होणारे क्षारतेचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी वेळेत उपाययोजना करता येतात.सिंचन पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करता येते.खतांचा संतुलित वापर करण्यास मदत होते.मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी निर्णय घेता येतात.दीर्घकालीन मृदा व्यवस्थापन अधिक प्रभावी बनते..सेंद्रिय कार्बन सेन्सरमातीच्या सुपीकतेचा, जैविक क्रियाशीलतेचा आणि एकूण मृदा आरोग्याचा हा महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. मातीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन तयार झालेला सेंद्रिय कार्बन मातीची रचना सुधारतो, पाणी धारण क्षमता वाढवतो. पोषकद्रव्यांचे संचयन करतो आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण करतो. पारंपरिक पद्धतींमध्ये सेंद्रिय कार्बनचे मापन प्रयोगशाळेत केले जाते. मात्र आधुनिक सेन्सर तंत्रज्ञानामुळे हे मापन अधिक जलद, अचूक आणि सुलभ झाले आहे. नियर इन्फ्रारेड (एनआयआर), मिड इन्फ्रारेड (एमआयआर) आणि हायपरस्पेक्ट्रल स्पेक्ट्रोस्कोपी यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण त्वरित मोजता येते..सेंद्रिय कार्बन सेन्सर मातीवर विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश टाकतात आणि मातीकडून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचे विश्लेषण करतात. सेंद्रिय पदार्थ प्रकाशाचे शोषण आणि परावर्तन विशिष्ट पद्धतीने करतात. या स्पेक्ट्रल नमुन्यांच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांख्यिकीय मॉडेल्सचा वापर करून मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण निश्चित केले जाते..Brown Biorefinery: ‘ब्राउन बायोरिफायनरी’तून कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन.उपयोगमातीची सुपीकता आणि गुणवत्ता निश्चित करणे.सेंद्रिय कार्बनचे नियमित निरीक्षण करणे.कार्बन संचयन आणि हवामान बदल अभ्यासासाठी माहिती मिळवणे.सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती व्यवस्थापनाचे मूल्यांकन करणे.हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट आणि पीक अवशेष व्यवस्थापनाचा परिणाम मोजणे.अचूक शेतीमध्ये मृदा नकाशे तयार करणे.शाश्वत कृषी पद्धतींच्या प्रभावाचे परीक्षण करणे..फायदेमातीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण त्वरित आणि अचूकपणे समजते.सुपीकता टिकवण्यासाठी आवश्यक व्यवस्थापन उपाययोजना निश्चित करता येतात.सेंद्रिय खतांचा आणि पीक अवशेषांचा प्रभाव मोजता येतो.मातीची पाणी धारण क्षमता आणि पोषकद्रव्य साठवण क्षमता सुधारण्यासाठी नियोजन करता येते.कार्बन संचयन वाढवून हवामान बदलाच्या परिणामांवर नियंत्रण मिळविण्यास हातभार लागतो.दीर्घकालीन उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होते..एनपीके सेन्सरएनपीके सेन्सर हे मातीतील नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचे प्रमाण मोजणारे आधुनिक उपकरण आहे. पारंपरिक पद्धतींमध्ये एनपीकेचे विश्लेषण प्रयोगशाळेत केले जाते, परंतु आधुनिक एनपीके सेन्सर आणि स्मार्ट मृदा परीक्षण प्रणालींच्या साहाय्याने शेतातच जलद आणि तुलनेने अचूक माहिती मिळविणे शक्य झाले आहे..एनपीके सेन्सर मातीतील पोषकद्रव्यांचे प्रमाण विद्युत-रासायनिक आयन-निवडक किंवा स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजतात. सेन्सर मातीतील अन्नद्रव्यांशी संबंधित संकेत गोळा करून त्यांचे डिजिटल विश्लेषण करतात. ही माहिती संगणक किंवा क्लाउड-आधारित प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते. काही प्रगत प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगचा वापर करून खतांच्या शिफारशीदेखील देतात..उपयोगमातीतील नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण त्वरित समजते.पिकांच्या गरजेनुसार खत व्यवस्थापनाचे नियोजन करता येते.अन्नद्रव्यांच्या कमतरतेची प्रारंभिक अवस्थेत माहिती मिळते.खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.मृदा आरोग्याचे नियमित निरीक्षण करता येते.पीकनिहाय आणि क्षेत्रनिहाय खत शिफारशी तयार करता येतात..फायदेआवश्यक प्रमाणात खते वापरता येतात.खतांवरील अनावश्यक खर्च कमी होतो.अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा सुनिश्चित होतो.पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ होते.मातीतील पोषकद्रव्यांचे संतुलन राखले जाते.भूजल आणि पर्यावरण प्रदूषणाचा धोका कमी होतो..मातीचे तापमान सेन्सरमातीचे तापमान वनस्पतींच्या जीवनचक्रातील अनेक प्रक्रियांवर प्रभाव टाकते. योग्य तापमानात उगवण जलद होते, मुळांची वाढ चांगली होते आणि पोषकद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावीपणे होते. तापमान खूप कमी असल्यास उगवण उशिरा होते तर जास्त तापमानामुळे मुळांवर ताण येऊन वाढ मंदावते. तसेच पाण्याचे बाष्पीभवन आणि मातीतील उपयुक्त जीवाणू आणि बुरशी यांची कार्यक्षमता देखील तापमानावर अवलंबून असते..मातीचे तापमान मोजणारे सेन्सर हे मातीतील तापमान अचूकपणे मोजण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे उपकरण आहे. हे सेन्सर थर्मिस्टर, थर्मोकपल किंवा डिजिटल तापमान मापन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे सेन्सर मातीमध्ये ७ सेंमी आणि १५ सेंमी खोलीवर बसविले जातात आणि त्या स्तरावरील तापमान सतत मोजतात. सेन्सरद्वारे मिळालेली माहिती डेटा लॉगर, संगणक किंवा स्मार्ट कृषी व्यवस्थापन प्रणालीमध्ये संग्रहित केली जाते. यामुळे तापमानातील बदलांचे सतत निरीक्षण करता येते..उपयोगपेरणीसाठी योग्य कालावधी निश्चित करता येतो.बियाण्यांच्या उगवणीसाठी अनुकूल परिस्थितीचे मूल्यांकन करता येते.पिकांच्या वाढीचे आणि विकासाचे निरीक्षण करता येते.मातीतील सूक्ष्मजीवांच्या क्रियाशीलतेचा अभ्यास करता येतो..सिंचन आणि खत व्यवस्थापनाचे नियोजन करता येते.हरितगृह आणि संरक्षित शेतीमध्ये तापमान नियंत्रण करता येते.मुळांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध होते.पोषकद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावीपणे होते.सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन मातीची सुपीकता सुधारते.उत्पादनात वाढ आणि पीक गुणवत्तेत सुधारणा होते.- डॉ. समाधान सुरवसे, ९८६०८७७०४९- डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१(वसंतदादा शुगर इन्टिट्यूट, मांजरी बु. जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.