Raigad News: ‘‘मातीला जिवंत परिसंस्था मानून तिचा ऱ्हास टाळणे, आरोग्य शाश्वत ठेवणे, सुपीकता, उत्पादकता टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने माती व्यवस्थापनाच्या पद्धती अवलंबविणे गरजेचे आहे. शेती जगविण्यासाठी मातीचे संवर्धन अपरिहार्य आहे,’’ असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांनी येथे केले..संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात थायलंडचे राजे दिवंगत भूमीबोल अदुल्यदेज यांची जयंती जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते..Soil Conservation: गणेश नानोटेंच्या ३२ वर्षांच्या शाश्वत शेतीचे रहस्य; गोपाल हागे यांचा ग्राउंड रिपोर्ट.ते म्हणाले, की मृदा ही आपली जननी आहे. मृदाच्या महतीची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. मातीची निर्मिती होण्यास शेकडो वर्षे लागतात म्हणून तिची काळजी घेणे काळाची गरज आहे.शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये. शेती किफायतशीर होण्याचे मार्ग उपलब्ध असून आता व्यावसायिक शेतीकडे वळण्याची गरज आहे, असे ते म्हणाले..शेतकऱ्यांनी मागणी केल्यास रब्बीसाठी बियाणे उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. संशोधन केंद्राला गतिमान भात पैदास प्रकल्प मंजूर झाल्याने नव्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप भात बियाणे चार ते पाच वर्षांत उपलब्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..Soil And Water Conservation : शिवारातील पाणी शेतातच अडवून जिरविण्याचे उपाय.प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत मांडे यांनी वातावरणातील बदल व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करीत शासकीय धोरणांची अंमलबजावणी तळमळीने करण्याची गरज प्रतिपादित केली..या वेळी कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, वनस्पती शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुस्कर, कनिष्ठ संशोधन सहायक महेशकुमार, प्रगतिशील शेतकरी निलिकेश दळवी व हेमंत कोंडीलकर यांनी मनोगत व्यक्त केले..प्रास्ताविकात कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी शेतकऱ्यांचे मसिहा थायलंडचे राजे दिवंगत भूमीबोल अदुल्यदेज व जागतिक मृदा दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.