Agri-Business Growth: राज्यातील निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ‘स्मार्ट’ प्रकल्पामुळे बळकटीकरण झाले आहे. या कंपन्यांनी विविध व्यवसायांमधील स्वगुंतवणूक आता ७०५ कोटी रुपयांच्या पुढे नेली आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या मुख्यालयातून देण्यात आली. .बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाद्वारे (स्मार्ट) आतापर्यंत एक हजार ५६ कोटींचे अनुदान वाटण्यात आले आहे. राज्यातील ९८७ समुदाय आधारित संस्थांच्या (सीबीओ) प्रकल्पांना स्मार्टने साह्य केले आहे..स्मार्टमधील उपप्रकल्पांची किंमत आता एक हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे यातील कंपन्यांची गुंतवणूक ७०५ कोटी ९९ लाख रुपयांपर्यंत गेली आहे. ३४ जिल्ह्यांमधील १९ हजार १९० गावांमध्ये सात लाखांहून अधिक शेतकरी आता स्मार्टच्या लाभक्षेत्रात आले आहेत..SMART Scheme: ‘स्मार्ट’ योजनेतून अल्प खर्चात घराघरांत सौर.राज्यातील कोणत्या श्रेणीतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे स्मार्ट प्रकल्पाचा लाभ होतोय, याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार स्मार्टच्या विविध संस्थांमधील लाभधारकांमध्ये ३.२८ लाख (५४ टक्के) शेतकरी महिला भागधारक आहेत, असे मुख्यालयाचे म्हणणे आहे. याशिवाय अनुसूचित जातीमधील भागधारक ७२ हजार (१० टक्के), अनुसूचित जमातीचे ५३ हजार (८ टक्के) तसेच अल्प व अत्यल्प भूधारणा असलेले भागधारक शेतकरी ५.६१ लाख (७९ टक्के) आहेत..स्मार्टमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी संस्थांना कर्ज मिळण्यासाठी स्मार्ट व्यवस्थापनाने ९ बॅंकांसोबत सामंजस्य करार केले. त्यातून राज्यातील ५४८ संस्थांना विविध बॅंकांनी आतापर्यंत ३८० कोटींहून अधिक कर्ज वाटले आहे..स्मार्टमुळे राज्यात काही अकृषी उपक्रमांनादेखील चालना मिळाली आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत ६१० सीबीओंना स्वच्छतागृह उभारणीसाठी १२.८१ कोटी मंजूर झाले आहेत. २०८ सीबीओ सौरऊर्जा उपक्रमात आघाडी घेत आहेत. स्मार्टमधील ३४६ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बाजार जोडणीद्वारे ७९ हजार ३०७ टन शेतीमालाची विक्री केली असून, त्याचे बाजारमूल्य २७० कोटी रुपयांचे आहे. राज्यात फळे, सोयाबीन, मका, पौष्टिक भरडधान्ये, कडधान्य, कापूस आणि भाजीपाला कमोडिटी स्टेवर्डशिप कौन्सिल स्थापन केले जात आहे. कौन्सिलची नोंदणी झाली असून, त्याअंतर्गत संबंधित पिकांच्या विविध उपक्रमांना अनुदान मिळणार आहे..Smart Farming: शेतीव्यवस्था असेल स्मार्ट अन् शाश्वत.सव्वापाच लाख टनांची गोदाम क्षमताराज्यातील शेतकऱ्यांसाठी स्मार्टमुळे समुदाय आधारित संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीवर विविध गोदामांची ५.२४ लाख टनांची साठवण क्षमता तयार होते आहे. याशिवाय ४५८ धान्य प्रक्रिया सुविधा, १९९ डाळ मिल, ९४,२१९ टन क्षमतेच्या कांदा चाळी, ६५ शीत साखळी प्रकल्प, १०६ राइस मिल, १०० पीठ गिरण्या, ३८ ऑइल मिल, ३६७ अवजार बॅंका तसेच ९५ पशुखाद्य निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत..सहा महिन्यांपूर्वी मी ‘स्मार्ट’ची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर सतत पाठपुरावा केल्याने पूर्वीचा प्रकल्प निधी वाटप ३२ टक्क्यांहून आता ५० टक्क्यांवर वाढवण्यात आला आहे. या प्रकल्पाला आणखी गती देण्यासाठी आम्ही राज्यभर शिबिरे घेऊ. काही शिबिरांना मी स्वतः जाईन. शिबिरांमधून शेतकरी संस्थांच्या समस्या जाणून घेत तत्काळ उपाय काढले जातील.एम. जे. प्रदीप चंद्रन, प्रकल्प संचालक, स्मार्ट.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.