Storm Damage In Sindhudurg: सिंधुदुर्गनगरी- जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील लोरे परिसराला मंगळवारी (ता. ६) सायंकाळी पुन्हा वादळाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये दहापेक्षा अधिक घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लोरे येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने वैभववाडी-फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी झाल्या. वादळामुळे लोरे परिसरातील अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला..जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अनेक भागांत विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी झाल्या होत्या. वैभववाडी तालुक्यातील लोरे येथे रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारनंतर पुन्हा विजांचा गडगडाट सुरू झाला. जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास लोरे परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसला..Sindhudurg Rain Update: वैभववाडी, दोडामार्गात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस.या वादळात सुमारे १० घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. काही घरांचे छप्पर तर काही घरांच्या छपरांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले. मोतीराम पुंडलिक सुतार, प्रणय प्रवीण रावराणे, प्रकाश गुरव, आनंदी सुतार, सुचित्रा रावराणे, जयराम रावराणे, विजया घाडी यांच्यासह दहा पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे..Sindhudurg Rainfall Update: सिंधुदुर्गात सप्टेंबरमध्ये ५६ टक्के पाऊस तूट.वैभववाडी-फोंडा मार्गावर सात ते आठ ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शाळा सुटण्याच्या वेळेत हे वादळ झाल्याने शाळकरी मुलेही रस्त्यातच अडकून पडली. ही माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. दरम्यान, स्थानिकांनी रस्त्यावर कोसळलेली झाडे हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली..तालुक्याच्या सर्वच भागांत विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागांत जोरदार सरी झाल्या. वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने लोरे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. येथील नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.