Shetkari Aatmhatya : दुर्देवी! आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मार्चपासून १ रुपयाही मदत नाही

Farmer Family Help : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान या भागात मागच्या ५ महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Shetkari Aatmhatya
Shetkari AatmhatyaAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान या भागात मागच्या ५ महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत दुर्देवाची बाब म्हणजे आत्महत्याग्रस्त कुटुंबांकडे सरकारने अक्षरश: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

मागच्या ५ महिन्यांपासून एकाही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सरकारकडून सरकारकडून १ लाख रुपयांची रक्कम मिळाली नसल्याची माहिती समोर आली. यामुळे वंचित कुटुंबांमध्ये सरकारबद्दल संतापाची भावना आहे.

मागच्या ५ महिन्यांत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत ३९१ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. सरासरी दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत असल्याचे गंभीर चित्र मराठवाड्यात आढळत आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना शासनाकडून मात्र कोणतीच मदत मिळाली नाही.

दरम्यान शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाख रुपये दिले जातात. परंतु दिला जाणारा निधी मार्च महिन्यापासून प्रशासनापर्यंत पोहोचलाच नाही. तर विभागीय आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव पाठवून देखील मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा निधी मिळालेला नाही.

Shetkari Aatmhatya
Farmer Suicide : बीडमध्ये जूनमध्ये रोज एक शेतकरी आत्महत्या

ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ७० हजार रुपये प्रदान केले जातात, तर उर्वरीत ३० हजार रुपये बँकेत डिपॉझिट केले जातात. परंतु मागच्या ५ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कुटुंबांना कवडीही मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा निधी मिळाला. मात्र त्यानंतर निधी रखडला आहे.

मागच्या ४ महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला. हातातोंडाशी आलेली पीके गेली. या सगळ्यांमुळे गेल्या ३ महिन्यांत सर्वाधिक ८९ आत्महत्या झाल्या आहेत. तर मे महिन्यातही ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

परंतु जानेवारी महिन्यात 5, फेब्रुवारीमध्ये 4 तर मार्च महिन्यात केवळ एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात आली.

याबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९८ प्रकरणे प्रलंबित आहेत तर २३६ प्रकरणे अनुदानासाठी पात्र ठरल्याची माहिती आहे. तर ५७ जण या निकषात न बसल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे. मागच्या पाच महिन्यांपासून फक्त १० लाखांचा निधीच शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com