Silver Rate : चांदीचा भाववाढीचा उच्चांक

Silver Market : प्रतिकिलो ९० हजार ७०० रुपये; सोने दर स्थिर
Silver Rate
Silver RateAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Silver Bazar : नागपूर ः सहा दिवसांत सोने आणि चांदीच्या भावात सतत वाढ झाली आहे. चांदच्या दरात एकाच दिवसात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन उच्चांकी ९० हजार ७०० रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचली आहे. सोन्याचे भाव ७४ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर स्थिर आहेत. सहा दिवसांत सोने १ हजार ६०० तर चांदी ५ हजार ९०० रुपयांनी महागली.

मार्च महिन्यात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना चांदीच्या भावात फारशी वाढ झाली नव्हती. एप्रिलमध्ये चांदीच्याही भावात वाढ सुरू झाली. नंतर मात्र एप्रिलच्या अखेरीस भाव कमी झाले. पुन्हा मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून त्यात वाढ होऊ लागली. त्यात १३ मेपासून तर सातत्याने वाढ होत आहे. १८ मे रोजी सर्वच उच्चांक मागे टाकत थेट एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर ९० हजार ७०० रुपयांवर पोहोचले.

Silver Rate
Gold Silver Rate : सोन्या चांदीची ऐन सनासुदीत का होतेय वाढ?

एकीकडे चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून सोन्याच्या भावातही वाढ झाली. सोने ७४ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. सहा दिवसांत सोने १ हजार ६०० वाढून दर ७४ हजार २०० रुपयांवर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक चांदीची मागणी वाढल्याने ही भाववाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर गुंतवणुकीचा सर्वांत सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळेच सर्वदूर सोने-चांदीच्या दरात तेजी आल्याचे सांगितले जाते.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com