Sangali News: सांगली जिल्ह्यात महारेशीम अभियान अंतर्गत रेशीम विभागाकडे २०० एकरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २५७ एकरांची नोंदणी झाली असून ९७ एकरांवर तुतीची लागवड झाली आहे. तुती लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आहेत. .तसेच रेशीम विभाग आपल्या दारी योजना ३० सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येत असल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना मिळण्यासाठी रेशीम संचालनाय विविध योजना राबवत आहे. त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले आहेत..Tuti Cultivation : नांदेडमध्ये ११२० एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी.महारेशीम अभियान अंतर्गत रेशीम विभागाला २०० एकर, कृषी विभाग २०० आणि जिल्हा परिषदेकडे ३०० एकर असे एकूण ७०० एकरावरचे उद्दिष्ट होते. तुती लागवड करण्यासाठी रेशीम विभागाने प्रचार आणि प्रसिद्धी केली होती. रेशीम विभागाने २५७ एकराची नोंदणी पूर्ण केली आहे..जिल्ह्यात मे महिन्यात पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना लागवड पूर्व तयारी करत आली नाही. त्यामुळे तुती लागवडीस अडथळे निर्माण झाले. परिणामी ९७ एकरांवर तुतीची लागवड झाली आहे. पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुती लागवडीची तयारी सुरु केली आहे. लवकरच तुती लागवड पूर्ण होईल, असेही संबंधित विभागाने सांगितले आहे..Tuti Cultivation : तुती लागवडीचे अधिकार आता कृषी अधिकाऱ्यांनाही.रेशीम विभाग आपल्या दारीजिल्हा रेशीम कार्यालय, सांगली यांच्या वतीने रेशीम विभाग आपल्या दारी ही विशेष मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी रेशीम योजनेसाठी नोंदणी केलेल्या, परंतु तुती लागवड न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम उद्योगाची माहिती देणे, उद्योग सुरू करण्याचे आवाहन करणे आणि तुती लागवड न करण्यामागील कारणांचा अभिप्राय घेणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे..रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाते. एका गावातील किमान ५ शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करावा लागतो. प्रति एकर ५०० रुपये नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.