Fertilizer Shortage : संयुक्त खताची टंचाई; पर्यायी खते वापरा

Urea : रब्बी हंगामातील पेरण्या, उसाची लागवड सुरू आहे. मात्र यंदा बहुतांश भागात मागणी असलेल्या डीएपी १८४६, १०ः२६ः२६ यांसारख्या संयुक्त खतांसह युरियाचीही काही भागात टंचाई आहे.
Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : रब्बी हंगामातील पेरण्या, उसाची लागवड सुरू आहे. मात्र यंदा बहुतांश भागात मागणी असलेल्या डीएपी १८४६, १०ः२६ः२६ यांसारख्या संयुक्त खतांसह युरियाचीही काही भागात टंचाई आहे.

त्यामुळे या खतांऐवजी पिकांना अन्य कोणती पर्यायी खते वापरणे योग्य राहील हे सुचवावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान टंचाई असलेल्या खतांऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे.

रब्बीत ज्वारी, हरभरा, गव्हाच्या पेरण्या सुरू आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने नदी, धरणाच्या पट्ट्यात उसाची लागवडही जोरात सुरू आहे. त्यामुळे डीएपी १८४६, १०ः२६ः२६ यांसारख्या संयुक्त खतांसह युरियाचीही मागणी वाढत आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यासह बहुतांश भागात खतांची टंचाई आहे.

Fertilizer Shortage
Fertilizer Shortage : जळगावात खतांची लिंकिंग, टंचाई; खतबाजारात शेतकऱ्यांची लूट

अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण यंदा रब्बीसाठी ३ लाख ६ हजार ८५० टन खत पुरवठ्याला मंजुरी मिळाली. प्रामुख्याने डीएपी व अन्य मागणी असलेल्या खतांची टंचाई असल्याने त्या जागी अन्य खते वापरता येतील, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी सांगितले.

डॉ. दुरगुडे यांनी सुचवलेल्या बाबीनुसार नत्र, स्फुरद व पालाशची शंभर किलो प्रमाणातील रासायनिक खतातील अन्नद्रव्यांची ग्रेड तयार करण्यासाठी १५ः१५ः१५ ऐवजी ३३ किलो युरिया, ९४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश, १०ः२६ः२६ ऐवजी २२ किलो युरिया, १६३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४३ किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश, २०ः२०ः० ऐवजी ४३ किलो युरिया, १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १९ः१९ः१९ ऐवजी ४१ किलो युरिया, ११९ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ३१ किलो म्यरेट ऑफ पोटॅश, २४ः २४ः ०० ऐवजी ५२ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेटचे मिश्रण करावे.

Fertilizer Shortage
Wheat Fertilizer Management : गहू पिकासाठी खत व्यवस्थापन

अमोनियम सल्फेटचा वापर असणारे खत आम्लधर्मीय असून २०.६ टक्के नत्राबरोबर २४ टक्के गंधक असते. त्यामुळे १५ः१५ः१५ ऐवजी ७३ किलो अमोनियम सल्फेट, ९४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश, १०ः२६ः२६ ऐवजी ४९ किलो अमोनियम सल्फेट, १६३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४३ किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश, २०ः२०ः० ऐवजी ९७ किलो अमोनियम सल्फेट, १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १९ः१९ः१९ ऐवजी ९२ किलो अमोनियम सल्फेट, ११९ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ३१ किलो म्यरेट ऑफ पोटॅश, २४ः २४ः ०० ऐवजी ११६ अमोनियम सल्फेट, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेटचे मिश्रण करून वापरात येईल.

अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) सेवा सहकारी सोसायटी नावाजलेली आहे. त्यामार्फत शेतकऱ्यांना खते पुरवठा केला जातो. सध्या ऊस तसेच रब्बीतील पिकांच्या पेरणीसाठी डीएपी, १८४६, १०ः२६ ः २६, युरिया यासारख्या खतांची गरज असते. सोसायटीला साधारणपणे मागणीच्या तुलनेत १० टक्के खत मिळाले आहे. त्यामुळे गरज असलेल्या खतांची टंचाई झाल्यास त्याला पर्यायी खते वापरावी लागणार आहेत.
- राकेश पाचपुते, अध्यक्ष, काष्टी सेवा सहकारी सोसायटी, काष्टी, जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com