Team Agrowon
बागायती गहू पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे
बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
निम्मे नत्र, तर स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेली नत्राची निम्मी मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावी.
उशिरा पेरणीसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे.
उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे.
जमिनीमध्ये लोहाची किंवा झिंकची कमतरता असल्यास, २० किलो फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेटची मात्रा शेणखतातून द्यावी. (ही मात्रा १०० किलो शेणखतामध्ये १५ दिवस मुरवून त्यानंतर द्यावे)
गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन १९:१९:१९ किलो (नत्र: स्फुरद: पालाश) या विद्राव्य खतांची किंवा २ टक्के डीएपी खताची पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनंतर फवारणी करावी.
विद्राव्य खत फवारणीसाठी १९:१९:१९ किंवा डीएपी खताचे २ टक्के द्रावण तयार करण्यासाठी २० ग्रॅम खत मात्रा प्रति लिटर पाण्यात मिसळून घ्यावी.
Buffalo Management : म्हशींच्या चांगल्या आरोग्यासाठी हिवाळा फायद्याचा