Nagpur News: गोरगरिबांचे पोट भरण्यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) केंद्रे उभारली. या माध्यमातून अतिशय अल्प दरात जेवण त्यांना देण्यात येते. यासाठी सरकारतर्फे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. मात्र सुमारे दहा महिन्यांपासून शिवभोजन थाळी चालकांना अनुदानच देण्यात आलेले नाही. नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या धुरळ्यात सरकारला अनुदानाचा विसर पडला असा आरोप आहे..दरम्यान, अनुदानाअभावी शिवभोजन थाळी केंद्र बंद पडण्याची वेळ आली असताना सरकारला जाग आली आहे. प्रलंबित मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यावर तोडगा काढला जाईल असा दावा बावनकुळे यांनी केला आहे..Anandacha Shidha Yojana : आनंदाचा शिधा, ‘शिवभोजन’ बंद पडण्याचे संकेत. मात्र लवकरात लवकर म्हणजे किती महिने हे त्यांनी स्पष्ट केले नाही. हे बघता आणखी किती महिने शिवभोजन थाळी चालकांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे. नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवभोजन थाळी चालकांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. .शिवभोजन योजनेला अनुदानाअभावी घरघर : सुधीर मुनगंटीवार .त्यानंतर बावनकुळे म्हणाले, मागील कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती. काही ठिकाणी चार, तर काही ठिकाणी सहा ते नऊ महिन्यांपासून पैसे थकीत आहेत..मुख्यमंत्र्यांशी चर्चाअनेकांनी कर्ज काढून ही योजना चालवली असून त्यांच्या भावना संतप्त आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे. यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.