Onion Nursery
Onion NurseryAgrowon

Onion Seedling Shortage : कांदा रोपवाटिकांत रोपांची तूट

Onion Cultivation : कांदा दरातील स्थिरता लक्षात घेऊन अनेक जण कांदा लागवडीकडे वळले आहेत. परंतु कांदा रोपवाटिकांमध्ये कांदा रोपांची हवी तशी उगवण झालेली नाही.
Published on

Jalgaon News : कांदा दरातील स्थिरता लक्षात घेऊन अनेक जण कांदा लागवडीकडे वळले आहेत. परंतु कांदा रोपवाटिकांमध्ये कांदा रोपांची हवी तशी उगवण झालेली नाही. जी रोपे उगवली, त्यातही मर झाली असून, रोपांची तूट अनेक भागात दिसत आहे.

हवी तशी उगवण नसलेले बियाणे मिळाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. कापूस व अन्य भाजीपाला पिके कमी करून अनेक शेतकरी कांदा लागवडीचे नियोजन करीत आहेत. पण कांदा दर हवे तसे नसतानादेखील कांदा बियाण्याचे दरही चढेच ठेवण्यात आले. काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून उत्पादित कांदा बियाण्याची थेट खरेदी केली आहे.

हे बियाणे ५०० ते ८०० रुपये प्रतिकिलो या दरात मिळाले. पण काही बियाणे पुरवठादारांनी शेतकऱ्यांकडून अल्प दरात खरेदी केलेल्या कांदा बियाण्यावर किरकोळ प्रक्रिया, स्वच्छता करून ते बाजारात विक्रीसाठी आणले.

काही कांदा बियाणे पुरवठादारांनी दुय्यम दर्जाच्या बियाण्याची चकचकीत पॅकिंगमध्ये शेतकऱ्यांना १२००, १५०० ते २००० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री केली आहे, असा आरोपही शेतकरी करीत आहेत.

Onion Nursery
Onion Nursery : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग

खानदेशात यंदाही कांदा बियाणे उगवणीच्याही तक्ररारी आहेत. तसेच यामुळे अनेक शेतकरी पुणे, नगरसह कृषी विद्यापीठाकडून निर्मित कांदा बियाणे खरेदी करीत आहेत. कारण कांदा पिकास खर्च अधिक लागतो.

पुढे हा खर्च करून चांगले उत्पादन, हवे तसे उत्पादन हाती न आल्यास अडचणी तयार होतात. ही बाब लक्षात घेऊन शुद्ध व दर्जेदार कांदा बियाणे खरेदीसंबंधी शेतकऱ्यांनी विविध भागात संपर्क केला.

कांदा बियाणे महाग...

जसे कापूस, मक्याचे बियाणे यंदा महाग झाले. तसे कांदा बियाणेदेखील पाच ते १० टक्क्यांनी महाग झाले. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. दुसरीकडे दर हवे तसे नसल्याने नफा कमी होत आहे किंवा नुकसान, वित्तीय भार वाढत आहे. कांदा बियाण्याचे वेगवेगळे दर बाजारात होते.

Onion Nursery
Onion Cultivation : लेट खरीप कांदा लागवडीची तयारी

यावर प्रशासन, कृषी विभागाने नियंत्रण आणावे व सरळ, संयुक्त रासायनिक खतांप्रमाणे एकाच दरात कांदा बियाणे शेतकऱ्यांना मिळावे, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. खानदेशात कांदा रोपवाटिका धुळे जिल्ह्यात अधिक आहेत.

साक्री तालुक्यात कांदा लागवड अधिक होईल. अनेक शेतकरी आता लेट खरिपासाठी कांदा रोपवाटिका तयार करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, यावल भागात कांदा रोपवाटिका आहेत. नंदुरबारात नंदुबार, नवापूर, शहादा भागात कांदा रोपवाटिका आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com