MLA Anil Babar Passed Away: शेतकऱ्यांच्या इंच इंच पाण्यासाठी लढणारे आमदार अनिल बाबर यांनी घेतला अखेरचा श्वास

Anil Babar Death News : न्यूमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते. खानापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.
MLA Anil Babar
MLA Anil BabarAgrowon

Sangli Khanapur Anil Babar : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात पहिल्यांदा विश्वासू आमदार म्हणून अनिल बाबर गेले होते. न्यूमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते. खानापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. टेंभू योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते.

सांगली जिल्ह्यातील दुर्गम असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा अनिल बाबर यांनी २०१९ ला पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले.

दरम्यान, ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी दिलेल्या नावाच्या यादीत अनिल बाबर यांच्या नावाचाही समावेश होता. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि विटा मतदार संघातील काही भागात पाण्याची मोठी समस्या असल्याने आमदार अनिल बाबर यांनी मागच्या मोठा संघर्ष करत या भागात पाणी आणण्याचे काम केले आहे. तसेच मागच्या दोन महिन्यांपूर्वी खानापूर, तासगाव, खटाव, सांगोला यासह अन्य तालुक्यातील टेंभूपासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे यासाठी टप्पा क्रमांक सहाचा मंजुरी प्रस्ताव सभागृहात मांडून त्यास मान्यता घेतली.

दरम्यान बाबर मागच्या काही महिन्यांपासून थोडे अस्वस्थ होते. मंगळवारी सकाळी त्यांना उपचारासाठी सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

MLA Anil Babar
Krishna River Sangli : कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी, शेतीसह नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली

खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये आमचे सहकारी अनिल बाबर यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते.

बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसारामुळे अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com