Palghar News: निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेवगा लागवड उत्पन्नाचा एक नवा आणि शाश्वत स्रोत ठरत आहे. वाडा तालुक्यातील प्रगतfशील शेतकरी कोंडू पष्टे यांनी आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून शेवग्याची यशस्वी लागवड केली असून, त्यातून वर्षाकाठी सुमारे दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे..शेवग्याच्या फुलांकडे मधमाश्यांचे विशेष आकर्षण असते. कोंडू पष्टे यांच्या बागेत सध्या शेवगा बहरला असून, त्यावर मधमाश्यांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. मधमाश्यांमुळे नैसर्गिक परागीभवन होऊन शेंगांची संख्या, आकार आणि दर्जा सुधारतो. मधमाश्यांच्या वावरामुळे फुलगळ कमी होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होत आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळल्यामुळे मधमाश्यांचे संरक्षण होऊन दर्जा सुधारला आहे..Moringa Cultivation : फायदेशिर शेवगा लागवडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?.शेवगा हे पीक कमी जागेत आणि कमी खर्चात येते. यंदा पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने नोव्हेंबरऐवजी डिसेंबरच्या अखेरीस बहर आला आहे..Moringa Cultivation : हलक्या जमिनीत हमखास येणारे शेवगा पीक|Agrowon | ॲग्रोवन.शेवगा मला चांगले उत्पन्न देत आहे. मुख्य फळपिकासोबत आंतरपीक म्हणून शेवगा लावला तरी कुटुंबाचा वार्षिक खर्च सहज निघू शकतो. शेतकऱ्यांनी आता नफा देणाऱ्या शेतीकडे वळायला हवे,असा सल्ला प्रगतशील शेतकरी कोंडू पष्टे यांनी दिला..मुंबई-गुजरातची बाजारपेठ जवळशेवग्याचे औषधी महत्त्व ओळखून मुंबई आणि शेजारील गुजरात राज्यात याला मोठी मागणी आहे. कॅल्शियमने समृद्ध असलेल्या शेवग्याला शहरी भागात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.आंतरपीक : आंब्याच्या बागेत १०×१० फूट अंतरावर शेवग्याची लागवड करता येते.लागवड ते उत्पन्न : रोपे लावल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत उत्पादन सुरू होते.शेंगांचे वैशिष्ट्य : शेंग साधारण दोन फूट लांब असून, एका किलोत केवळ पाच-सहा शेंगा भरतात.बाजारभाव : सध्या बाजारात ५० ते ५५ रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, मे महिन्यापर्यंत हे उत्पादन सुरू राहते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.