Sugarcane Farming: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. शशिकांत तरंगे यांनी बुधवारी प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्रास भेट दिली. या वेळी त्यांनी केंद्रातील पथदर्शक गुऱ्हाळघर तसेच यांत्रिकीकृत गुऱ्हाळघरातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली..संशोधन केंद्रातील अडचणी जाणून घेत डॉ. तरंगे यांनी केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच पूरबाधित क्षेत्रासाठी उसाचे नवीन वाण विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. .Badnapur Mosambi Research Centre: बदनापूरच्या मोसंबी संशोधन केंद्राला अखेर पूर्णवेळ प्रभारी अधिकारी.डॉ. विद्यासागर गेडाम यांनी केंद्रात सुरू असलेल्या ऊस संशोधनाची तसेच ऊस बेणे मळ्याची माहिती दिली. डॉ. दीपक सावळे यांनी गुळापासून तयार करण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित पदार्थांची माहिती दिली..Agriculture Advisory: पारंपरिकऐवजी नगदी पिकांकडे वळा : डॉ. भगवानराव कापसे.यावेळी डॉ. सुनील कराड, महेंद्र वळसे, अतुल पांडव, कृष्णा गुरव, सारिका पाटील, सुनीता खोत, आशिष जाधव आदी उपस्थित होते. .सूत्रसंचालन माहेश्वरी पांडव यांनी केले, कृषी सहाय्यक डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.