Lasalgaon Onion Rate : राज्यातील प्रमुख बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे प्रमुख बाजारात कांद्याच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. आशियातील प्रमुख कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत ६०० रुपयांनी दर घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. .सध्या रब्बी हंगामातील कांद्याची गुणवत्ता कमीच आहे. तर दुसरीकडे बांगलादेशमधील अस्थिरतेमुळे भारतीय कांद्याची निर्यात मंदावली आहे. तसेच अरब देशांच्या बाजारात चीन आणि पाकिस्तानमधून कमी दरात कांदा उपलब्ध होत आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची मागणी घटली आहे. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे..Onion Rate: केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीतील अस्थिर धोरणाचा फटका.आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारीला लासलगाव बाजारात १ हजार २०० ट्रकद्वारे २२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला कमाल दर प्रतिक्विंटल २ हजार १०९ रुपये मिळाला. तर किमान दर ५०० रुपये प्रति क्विंटलचा मिळाला. तसेच सरासरी दर प्रति क्विंटल सुमारे १ हजार ६०० रुपये मिळाला. या कमी दरांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे..गेल्या पंधरा दिवसांत नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सातत्याने होत आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर पुढील काही दिवस दरातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. कांदा दरातील सततच्या घसरणीमुळे भविष्यात लाल कांद्याचे उत्पादनही शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे..Onion Harvesting: लाल कांद्याच्या काढणीला वेग.सतत घसरत असलेले बाजारभाव लक्षात घेता कांदा उत्पादकांनी राज्य व केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. तसेच बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.