
Rashtravadi Congress News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा मंगळवारी (ता. २) केली.
आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहे, अशी घोषणा पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृह मुंबई येथील कार्यक्रमात केली.
शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती'च्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवार बोलत होते. पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सभागृहातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी पवारांना साकडे घातले. त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेत पवारांना घेराव घातला.
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृत कार्यकर्ते नाराज झाले होते. यावेळी आम्ही राजकारणात सक्रिय राहणार नाही, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी भाषणात सांगितले आहे.
आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आदि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी पवारांशी व्यासपीठावरच चर्चा केली.
पवारांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार म्हणाले, "पवार साहेबांनी अध्यक्षपदासाठी समिती नेमण्याचं सुचवले आहे. त्या समितीत पक्षाची माणसं असतील. समितीचा जो निर्णय होईल त्यानुसार अध्यक्ष निवड करण्यात यावी, अशी शरद पवारसाहेब यांची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता शांत राहावं." अशी विनंती अजित पवार यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.