Sharad Pawar Resign News : शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला मागे

NCP President Committee Decision : निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळून अध्यक्ष पदावर कायम राहण्याची विनंती केली होती.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Sharad Pawar Takes Back His Resignation : शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय माघार घेत असल्याचे जाहीर केले. धक्कातंत्राचा वापर करत शरद पवार यांनी २ मे रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. परंतु घेतलेल्या निर्णयाचा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर फेरविचार करत अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय पवारांनी जाहीर केला आहे. पवार शुक्रवारी (ता.५) संध्याकाळी ५.३० वाजता वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार यावेळी म्हणाले, "राष्ट्रवादी कॉँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील जनता नाराज झाली. त्यांनी मी घेतलेल्या निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले. देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध सहकारी आणि कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी मागणी केली. लोक माझे सांगाती हेच प्रदीर्घ सामाजिक जीवनाचे गमक आहे. आपल्या भावनेचा अनादर माझ्याकडून होऊ शकत नाही. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी सर्वाने आवाहन केले. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मी पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय घेत आहे."

कार्यकर्ते आणि पक्षातील नेत्यांनी हा निर्णय मागे घेण्याची पवारांना विनंती केली होती. त्यानुसार पवारांनी हा निर्णय मागे घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. (Sharad Pawar Live Press Conference)

Sharad Pawar
Sharad Pawar : राज्यघटना वाचविण्याच्या युद्धात पवार यांचे मोठे महत्त्व : थोरात

मागील तीन दिवस कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी करत, आंदोलन केलं होतं. त्यानंतर गुरुवारी (ता.४) पवारांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

सकाळी निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळून अध्यक्ष पदावर कायम राहण्याची विनंती केली होती. या ठरावात, "राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु या कमिटीने राजीनामा फेटाळत आहोत. त्यामुळे पवार साहेबांनी अध्यक्ष पदावर राहावं अशी कमिटीने सर्वानुमते ठराव पास करत आहोत," अशी भूमिका घेतली होती.

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवारांनी निवृत्तीचं पाऊल का उचललं?

निवड समितीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी सिल्व्हर ओकच्या येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली.

तसेच राजीनामा मागे घेण्याची विनंती केली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना दिली.

नेत्यांच्या भेटीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली. 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्र पुस्तकाच्या प्रसंगी बोलताना पवारांनी धक्कातंत्र वापरत अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली होती.

या नंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com