Minister Bhagwat Karad : शहाजीराजे भोसले स्मारक आणि मालोजीराजे भोसले गढीचा विकास करणार

वेरूळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचे नूतनीकरण प्रारंभ प्रसंगी डॉ. कराड बोलत होते.
Minister Bhagwat Karad
Minister Bhagwat KaradAgrowon

Aurangabad News : वेरूळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Minister Bhagwat Karad) यांनी दिली.

जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या (tourist spot) विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वेरूळ येथे शहाजीराजे भोसले (Shahjiraj Bhosale) स्मारक व मालोजीराजे भोसले (Malojiraje Bhosale) गढीचे नूतनीकरण प्रारंभ प्रसंगी डॉ. कराड बोलत होते.

कार्यक्रमास माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड, वेरुळचे सरपंच प्रकाश पाटील, अभिजित देशमुख, अनिल मानकापे, किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, की औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. या शहराला राज्य शासनाने पर्यटनाची राजधानी असे संबोधले आहे. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेण्यांमुळे पर्यटक आकर्षित होतात. त्यादृष्टीने पर्यटन वाढीसाठी तसेच पर्यटकांना सोईसुविधा तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार.

Minister Bhagwat Karad
गोदावरी खोऱ्यात ३२५ टीएमसी पाणी आणणे शक्य : डॉ. कराड

शहाजीराजे स्मारक व मालोजीराजे गढीच्या सर्वांगीण विकासासाठी सीएसआरमधून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विकासासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर साजेसे काम होणार आहे.

यामध्ये नाइट टुरिझम, आकर्षक वीज रोषणाई व पर्यटक आकर्षित होतील, असा विकास करण्यात येईल. गढीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही डॉ. कराड म्हणाले.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची जपणूक, संवर्धन, सौंदर्यीकरण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून अनेक कामांना निधी मिळवून देण्याबाबत आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच ही कामे गती घेतील, असा विश्‍वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड यांनी शिवजयंती उत्सवाबाबत माहिती दिली. शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा व महिलांसाठी दीपोत्सव असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी युवक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com