Water Scarcity : शहापूर तालुक्यावरील पाणीसंकट गडद

Water Crisis : ठाणे जिल्ह्यातील धरणांमुळे ओळख असलेल्या शहापूर तालुक्याला सध्या पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Palghar News : ठाणे जिल्ह्यातील धरणांमुळे ओळख असलेल्या शहापूर तालुक्याला सध्या पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत शहापूर तालुक्यातील १६ गावे आणि ७० वाड्यावस्त्या मिळून एकूण ८६ गावे, पाड्यांना २९ टँकरने पाणीपुरवठा येथे सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मेच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या भेडसावते. याच अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासनाकडून ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडादेखील तयार करण्यात आला आहे.

महसूल उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्याकडून २२ गावे आणि १०८ वाड्यावस्त्या एकूण १३० गावे, पाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठ्याला मंजुरीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तहसीलदार कळमगाव, शिळ, शेलवली (बां), वेहळोली (वासिंद) ही गावे टँकरने पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित केली आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : मिरज पूर्वभागातील तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी

त्यामुळे तातडीने दोन टँकर वाढविण्यात येणार असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत टंचाईग्रस्त गावे, पाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या येथे २५ इतकी होणार आहे. टंचाईग्रस्त गावे, पाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन युद्धपातळीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासोबतच अन्य उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पाणीटंचाईने गावे बाधित होत असली तरी या परिस्थितीवर नियंत्रण असल्याचे पंचायत समितीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या उपअभियंता विजया पांढरे यांनी सांगितले.

Water Scarcity
Water Scarcity : मेळघाटातील गावांना पाणीटंचाईचे चटके

पाणीपुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च

जिल्ह्याला फेब्रुवारीच्या अखेरीस पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जून-जुलैपर्यंत पाणीटंचाईची कळ सोसावी लागते. दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च करून टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहिरींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.

साथीचे आजार वाढण्याची भीती

आघाणवाडी, वाशाळा, वेळूक, अघई, खोस्ते या वाड्यावस्त्यांमध्ये टँकरचे पाणी पुरेसे नसल्याने नैसर्गिक जलस्त्रोतांच्या हद्दीत ओळसर जमिनीत खड्डे खोदून पाणी काढले जात आहे. हे पाणी काढताना रात्रंदिवस कसरत करावी लागत आहे. शिवाय गढूळ व मातीमिश्रित पाणी असल्याने साथीचे आजार वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेने टँकरची संख्या कमी पडत असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीन गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com