Reshim Udyog Fayade: वर्धा जिल्ह्यात रेशीम लागवडीला गती देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘महरोशिम अभियान’ला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या ३२५ एकर उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ १६५ एकर क्षेत्राचीच नोंदणी झाली असून उद्दिष्टाच्या सुमारे निम्मीच प्रगती झाली आहे..जिल्हा प्रशासनाने ४ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत व्यापक जनजागृती मोहीम राबवली. गावागावांत शिबिरे घेऊन शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या शिबिरांमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाभरात आयोजित १२८ शिबिरांत सुमारे २,०७० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्ष नोंदणी करणाऱ्यांची संख्या केवळ १३२ इतकीच राहिली आहे..Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे.दरम्यान, रेशीम लागवडीसाठी जिल्ह्यात ४४ नवीन गावांची निवड करण्यात आली आहे. तरीही नोंदणीचा वेग मंदावल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कमी पाण्यात आणि कमी श्रमात शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. लागवडीपासून कोष उत्पादनापर्यंत विविध टप्प्यांवर शासनाकडून अनुदानही उपलब्ध आहे..Silk Cocoon Purchase: हजार शेतकरी सहभागी झाले, तर औशात रेशीम कोष खरेदीची हमी.असे असतानाही शेतकरी नोंदणीस पुढे येत नसल्याने प्रशासनाची अस्वस्थता वाढली आहे. नोंदणी वाढवण्यासाठी प्रशासनाने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला असून इच्छुक शेतकऱ्यांना २७ एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी देण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पर्यायी व्यवसायाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे..जिल्ह्यातील नोंदणीतालुकानिहाय आकडेवारीनुसार आर्वी येथे १२ शेतकरी (१२ एकर), आष्टी २८ (३० एकर), कारंजा १३ (१४ एकर), देवळी १६ (२० एकर), सेलू १० (१५ एकर), वर्धा १८ (२३ एकर), हिंगणघाट १८ (२३ एकर) आणि समुद्रपूर २४ शेतकरी (२६ एकर) अशी नोंद झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.