Bachat Gat : कलाग्राममध्ये बचत गट उत्पादन विक्रीसाठी जागा देणार : भुजबळ

Chhagan bhujabal : नाशिक पंचायत समिती नाशिकच्या आवारात आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत रानभाजी महोत्सव व राखी महोत्सवास मंत्री भुजबळ यांनी भेट देत बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला.
Chhagan bhujabal
Chhagan bhujabalAgrowon
Published on
Updated on

Nashik News : गंगापूर गाव परिसरात साकारत असलेल्या कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनास विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Chhagan bhujabal
Women Self Help Group : महीला बचत गट उत्पादनांच्या ‘ब्रँडिंग’साठी डीपीसीतून तरतूद करू

नाशिक पंचायत समिती नाशिकच्या आवारात आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत रानभाजी महोत्सव व राखी महोत्सवास मंत्री भुजबळ यांनी भेट देत बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, पंचायत समिती गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कार्याध्यक्ष गोरख बोडके आदी उपस्थित होते. मंत्री भुजबळ म्हणाले, की कलाग्रामसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, या कालाग्राममध्ये कायमस्वरूपी १०० स्टॉल्स उभारले जाणार आहेत.

Chhagan bhujabal
Women Self Help Group : महीला बचत गट उत्पादनांच्या ‘ब्रँडिंग’साठी डीपीसीतून तरतूद करू

येत्या दोन ते तीन महिन्यांत कलाग्रामचे काम पूर्ण केले जाणार असून, ते स्वयंसहाय्य बचत गट, महिला बचत गट, आदिवासी महिला उद्योजक यांच्यासाठी माफक दरात खुले केले जाणार आहे. तसेच येवल्याच्या पैठणी केंद्रातदेखील हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. निसर्गाच्या सानिध्यात पिकलेल्या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि त्यांचा आहारातील समावेश आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवास भेट देऊन आरोग्यवर्धक रानभाज्या व वस्तू खरेदी कराव्यात. त्यासोबतच रानभाज्या बनविण्याची पाककृतीसुद्धा जाणून घ्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले. या महोत्सवात सुरू करण्यात आलेले तत्त्व ब्रॅन्‍ड, बाँडिंग स्टोरी ब्रॅन्ड आणि गोदा व्हॅली कार्ट या पोर्टलच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले.

महोत्सवाचे भुजबळांकडून कौतुक

रानभाजी महोत्सवातून जनसामान्यांना रानभाज्यांची आवड निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न उमेदच्या माध्यमातून होत आहे.येथील प्रदर्शनात तृणधान्यांपासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ,सेंद्रिय खतातून पिकविलेल्या भाज्या, रानभाज्या, पानवेलींपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, विविध डिझाइनच्या राख्या ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू अस्सल व कमी खर्चात बनविलेल्या आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून या वस्तूंना ऑनलाइन मार्केट उपलब्ध होत असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com