Jalyukta Shivar Abhiyan : ‘जलयुक्त’ २.० मध्ये जामखेड तालुक्यातील २२ गावांची निवड

Jalyukta Shivar : जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी जामखेड तालुक्यातील २२ गावांची निवड करण्यात आली आहे.
Jalyukta Shivar
Jalyukta ShivarAgrowon

Jalyukta Shivar Update In Jamkhed : जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी जामखेड तालुक्यातील २२ गावांची निवड करण्यात आली आहे.

राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान टप्पा २ जिल्हास्तरीय समितीने दुस-या टप्प्यात योजना राबवण्यासाठी जिल्ह्यातील गावांची नावे निश्चित केली आहेत. या बैठकीत जिल्ह्यातील २४० गावांची निवड करण्यात आली.

जलयुक्त शिवार योजनेच्या दुस-या टप्प्यात कृषी विभागामार्फत शेत बांधबंदिस्ती , सलग समतलचारी ,दगडाचे बांध,गॅबियन बंधारे, मातीचे नालाबांध, सिमेंट काँक्रिट नालाबांध, शेततळे, नाला खोलीकरण व गाळ काढणे, विहीर पुनर्भरण अशी कामे करण्यात येणार आहेत.

Jalyukta Shivar
Jalyukta Shivar Abhiyan : ‘जलयुक्त २.०’अंतर्गत ९१ गावांची निवड

तर वन विभागामार्फत सिमेंट बंधारे, मातीनालाबांध, दगडी बांध, गॅबियन बंधारे, सलग समतल चारी अशी कामे करण्यात येणार आहेत.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेतक-याच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवड करणे, कन्या वन समृद्धी योजना, अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत बांबू शेती लागवड, अटल आनंदवन घनवन योजना, वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना योजना राबवण्यात येणार आहे.

भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेमार्फत पुनर्भरण चर, पुनर्भरण चर आणि विंधन विहीर, भूमिगत बंधारे, गॅबियन बंधारे, अटल भूजल योजना, जलजीवन मिशन स्रोत बळकटीकरण करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. मृद व जलसंधारण विभागामार्फत सिमेंट नालाबांध ,कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे आणि पाझर तलाव दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत.

बावीस गावाची निवड

जामखेड तालुक्यातील कुसडगाव, कवडगाव, अरणगाव, पाटोदा, धानोरा, फक्राबाद, पिंपरखेड, खुरदैठण, माळेवाडी, हाळगाव,रत्नापूर, जवळा, लोणी, मुंगेवाडी, गुरेवाडी, खांडवी, डिसलेवाडी, वाघा, सारोळा, काटेवाडी, मोहा, सावरगाव या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना टप्पा दोन राबवला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com