Tur Godavari Variety : गोदावरी वाणाचे ८५ हेक्टरवर बीजोत्पादन

Tur Seed Production : कृषी विद्यापीठाने तुरीमध्ये लागवड ते काढणी पर्यंतच्या संपूर्ण कामांचे यांत्रिकीकरण केले आहे. त्यामुळे मजुरांवर होणाऱ्या खर्चासह वेळेत बचत होत आहे.
Tur Seed Production
Tur Seed ProductionAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अधिक उत्पादन क्षमता असलेल्या तुरीच्या गोदावरी (बीडीएन २०१३-४१) वाणाचा यंदा खरिपात (२०२४-२५) परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर कोरडवाहू क्षेत्रावर सलग ८५ हेक्टरवर पैदासकार बीजोत्पादन घेण्यात येत आहे.

दाणे भरलेल्या शेंगांनी तुरीचे पीक लदबदून गेले आहे. कृषी विद्यापीठाने तुरीमध्ये लागवड ते काढणी पर्यंतच्या संपूर्ण कामांचे यांत्रिकीकरण केले आहे. त्यामुळे मजुरांवर होणाऱ्या खर्चासह वेळेत बचत होत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात कृषी विद्यापीठाच्या मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावर २१२ हेक्टरवर तुरीच्या विविध वाणांचा पैदासकार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर एकट्या गोदावरी (बीडीएन २०१३-४१) वाणाचा ८५ हेक्टरवर पैदासकार बीजोत्पादन घेतेले जात आहे.

Tur Seed Production
Tur Prices Crashed by 5 thousand: तुरीचा भाव ५ हजाराने सहा महिन्यांमध्ये पडला; तुरीची हमीभावाने खेरदी वेळेत सुरु करण्याची मागणी

नववर्षाच्या प्रारंभी बुधवारी (ता.१) मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील गोदावरी तूर बीजोत्पादन पिकाची पाहणी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केली. यावेळी यावेळी संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विलास खर्गखराटे आदी उपस्थित होते.

विद्यापीठाने नव्याने लागवडीखाली आणलेल्या सायळा प्रक्षेत्रावर ३० हेक्टर, तरोडा, बलसा प्रक्षेत्र ५५ हेक्टर असे एकूण ८५ हेक्टरवर कोरडवाहू क्षेत्रात सलग गोदावरी वाणाची पेरणी केली आहे. २३ डिसेंबर रोजी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त प्रदर्शनातील तुरीच्या गोदावरी वाणाची पाहणी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Tur Seed Production
Tur Farming : तूर शेती शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय

त्या वेळी गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटलपर्यंत उतारा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तुरीच्या गोदावरी वाणाकडे उसाला पर्यायी पीक म्हणून शेतकरी पाहत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात गोदावरी वाणाचा १५ हजार ५०० हेक्टरवर पेरणी आहे.

करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यात ४० शेतकरी गटांच्या माध्यमातून ४०० हेक्टरवर पेरणी केली. बदनापूर (जि. जालना) येथील कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार टोकन करून लागवड,ठिबक सिंचन व जैविक घटकांचा वापर करून अधिक उत्पादन घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com