
Nashik News : सलग पाचव्या वर्षी खरिपासाठी सर्वाधिक बियाणे लागणाऱ्या मकासह विविध पिकांच्या बियाण्याची दरवाढ झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या माथी मोठा आर्थिक बोजा पडणार आहे.
जिल्ह्यात सुमारे ४० टक्के क्षेत्र व्यापणाऱ्या मकाच्या बियाण्यात साडेतीन ते चार किलोच्या थैलीत १०० ते ३५० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. याशिवाय मूग, तूर, बाजरी या बियाण्यांतही ५० ते १०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.
सलग पाचव्या वर्षी बियाण्यांच्या मोठ्या दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांवर पडला असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार आहे. एकीकडे मकासारखे एखादे पीक सोडले तर सर्वच शेती आतबट्ट्याची होत आहे. भावातील चढ-उतार आणि निसर्गाच्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्त्पन्न हाती येत नाही आणि आले तर भाव मिळत नाही, अशी परिस्थिती असताना शेतीसाठी वाढत चाललेले भांडवल तापदायक ठरत आहे.
मकाच्या दरात पुन्हा सुधारणा
जिल्ह्याचा पीक पॅटर्न मागील तीन-चार वर्षांत बहुतांश बदलला असून खरिपात मक्याचा जिल्हा अशी ओळख तयार झाली आहे. खरिपात जिल्ह्यात ६ लाख ५७ हजार हेक्टर वर खरिपाची पेरणी होते यातून तब्बल २ लाख ७८ हजार हेक्टरवर म्हणजेच सुमारे ४० टक्के मक्याचे पीक घेतले गेले आहे.
मक्याला वाढलेली मागणी त्याबरोबरच दरातील होणाऱ्या सुधारणेमुळे मका जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक बनले असून बियाण्यांची मागणी वाढल्याने कंपन्यांनी बियाणे पिशवीमागे १०० ते ३०० रुपयांची वाढ केली आहे. खरिपाच्या तोंडावर बियाणे पिशव्या बाजारात विक्रीला असून यावर्षी थैलीच्या किमतीने २१०० रुपयांचा टप्पा पार केला आहे. ॲडव्हान्स, महिको, पायोनियर, सिजेंटा, ॲडव्हान्टा या कंपनीच्या वाणाला जिल्ह्यात सर्वाधिक मागणी असते.
कपाशीसह बाजरी, मक्यात वाढ
कपाशीच्या बीटी २ बियाण्यांची दरवाढ शासनाच्या मान्यतेने होत असून सलग तिसऱ्या वर्षी वाढ झाल्याने एक किलोची पिशवी ९०१ रुपयांना मिळणार आहे. तूर, बाजरी, मूग बियाणे दरातही ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. सर्वच प्रमुख बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना यावर्षी बियाण्याच्या खरेदीमागे हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
याबीनमध्ये घट
जिल्ह्यातील काही भागांत सोयाबीनचे उत्पादन वाढले होते मात्र मागील दोन ते तीन वर्षांत दराने गटांगळ्या खाल्ल्याने त्याचा परिणाम क्षेत्र घटल्यावर झाला असून साहजिकच बियाण्यांची मागणी घटल्याने दरही कमी झाल्याचे दिसते. मागणी व पुरवठ्याचे सूत्र जुळत नसल्याने यावर्षी देखील ४०० ते ७०० रुपये दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल. अर्थात क्षेत्र कमी होत असल्याने बियाणे मागणीतही घट होत असल्याचे दिसते.
असे वाढले बियाण्यांचे दर (कंसात मागील वर्षीचे दर)
मका (३.५ ते ४ किलो)
पायोनियर ३५२४ - २२७५ (२०५०)
पायोनियर ३३०२ - १५०० (१३५०)
ॲडव्हान्टा ७५१ - २०५० (१९५०)
ॲडव्हान्टा ७५९ - १९६० (१५७०)
ॲडव्हान्टा ७४१ - २२७५ (२१००)
महिको ३८४५ - १६५० (१४५०)
महिको ४०६४ - १८०० (१६००)
हायटेक मका - ५१०१ - १५५० (१३००)
हायटेक मका - ५१०६ - १७०० (१४००)
सिजेंटा ६५४० - १६०० (१२५०)
सिजेंटा ६८०२ - १९०० (१६५०)
बायोसिड ९७९२ - १७१० (१४००)
कपाशी बीटी - ९०१ - ८६४
बाजरी (१.५ किलो)
महिको २०४ - ६५० (५००)
महिको २२२४ - ७०० (५५०)
पयोनियर ८६m९४ - ७५० (६००)
अजित ३७ - ५०० (४५०)
हायटेक ४२४२ - ६५० (५००)
सोयाबीन (२५ किलो)
ईगल ३३५ - २१८० (२३७५)
प्राईड ९९ - २८५० (२५५०)
ग्रीन गोल्ड ३३४४ - २६०० (२५००)
मूग (१ किलो)
निर्मल सिड्स - ३५० (३४०)
तूर (१ किलो)
अजित श्वेता - ३८० (३००)
अंकुर चारू - ४५०
(४००)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.