Seeds Collection : पशुधनाच्या चाऱ्यासाठी बिया संकलनाचा उपक्रम

Livestock Fodder : दुधाळ जनावरे संवर्धन वर्ष आणि वनमहोत्सवाचे औचित्य साधून निसर्गमित्र संस्थेने मानव तसेच पशुधनासाठी सकस अन्ननिर्मितीच्यादृष्टीने केलेल्या बिया संकलन आवाहनाला कोल्हापुरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Seed Collection
Seed CollectionAgrowon

Kolhapur News : दुधाचा सकसपणा वाढविण्यासोबत जनावरांना होणाऱ्या आजारांवर उपाय असणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड वाढविण्यासाठी निसर्गमित्र परिवाराने पुढाकार घेतला आहे. दुधाळ जनावरे संवर्धन वर्ष आणि वनमहोत्सवाचे औचित्य साधून निसर्गमित्र संस्थेने मानव तसेच पशुधनासाठी सकस अन्ननिर्मितीच्यादृष्टीने केलेल्या बिया संकलन आवाहनाला कोल्हापुरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमातून सुमारे दीड लाख दुर्मीळ बियांचे संकलन करण्यात आले. यातून पाच हजार रोपांची निर्मिती करून शिल्लक बिया गारगोटी येथील सामाजिक वनीकरण विभागाकडे सुपूर्द केल्या.

Seed Collection
Livestock Market : मालेगाव बाजार समितीतून ९७ गोवंश जनावरे जप्त

उपक्रमाची माहिती देताना निसर्गमित्रचे कार्यवाह अनिल चौगुले म्हणाले, ‘निसर्गमित्र परिवारातर्फे दरवर्षी बिया संकलनाचा उपक्रम राबविला जातो. यंदा लोकसहभागातून दीड लाख, इतर मोठ्या संख्येने विविध प्रकारच्या दुर्मीळ बिया जमा झाल्या. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी बेल, टेंभुर्णी, जांभूळ, बहावा, फणस, हिरडा, गावठी आंबा, शेंद्री, पळस, हादगा, गोकर्ण, अश्वगंधा, सब्जा,

Seed Collection
Fodder Availability : सांगलीत ९ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

आवळा, शेवगा, सीताफळ, वाळा भोकर, वेखंड कडीपत्ता, लिंबू, तमालपत्र, चिंच, म्हाळुंग, मिरी, कवठ, शमी, काटेसावर, कडूनिंब, रिटा, बदुर्गी अशा वनस्पतींच्या बिया दिल्या होत्या. या बियांतून निसर्गमित्र सदस्य व आदर्श सहेली मंचच्या महिलांनी सुमारे पाच हजार रोपांची निर्मिती केली. विविध प्रकारची रोपे ३१ जुलैपर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.’

रोपनिर्मिती करून शिल्लक राहिलेल्या बिया सामाजिक वनीकरण गारगोटी विभागाच्या वनक्षेत्रपाल उज्ज्वला मगदूम, वनपाल आनंदा ठोंबरे, वनरक्षक पी. बी. चव्हाण व जयसिंग पाटील यांच्याकडे प्रा. राजय पाटील यांच्या हस्ते सुपूर्द केल्या. या उपक्रमासाठी अनंत कुलकर्णी, पै. बाबाराजे महाडिक, दिलीप खराडे, संदीप पाटील, अनिता गावडे, राणिता चौगुले, यश चौगुले, सर्जेराव वाडकर, अवधूत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com