Seed Bill 2025: बीज विधेयक २०२५ : अन्नसुरक्षा की कॉर्पोरेट नियंत्रण?
Indian Agriculture Law: भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील मोठ्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीशी संबंधित कोणताही कायदा हा केवळ आर्थिक किंवा व्यापारी स्वरूपाचा न राहता, तो शेतकरी, अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम करणारा ठरतो.