Karjmafi Yojana Update 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला आहे. दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ४९९ शेतकऱ्यांना ७ कोटी ८९ लाख २९ हजार ७४२ रुपये वितरित केले आहेत..महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येत आहे. या द्वारे पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ७ हजार २९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते; मात्र आधार प्रमाणीकरण झालेल्या २ हजार ८३२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे १२ कोटी ९३ लाख ६८ हजार ६७८ रुपये जमा झाले आहेत..Farm Loan Waiver 2026 : कर्जमाफीचे ७ हजार कोटी रुपये मंगळवारी होणार वितरीत.अद्याप २ हजार ५१८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. ॲग्रीस्टॅक नसणे, मृत लाभार्थी, देवस्थान इनाम जमिनी, परगावी/स्थलांतरित शेतकरी, वयोमानामुळे ठसे जुळत नाहीत, जमीन नावावर नाही तसेच अन्य सात कोटींचा दुसरा हप्ता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १ हजार ४९९ शेतकरी पात्र ठरले आहेत..Farm Loan Waiver: दोन ते चार दिवसांत ५ ते १० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कृषिमंत्र्यांची माहिती.त्यांच्या बँक खात्यात ७ कोटी ८९ लाख २९ हजार ७४२ रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकूण ४ हजार ३३१ शेतकरी लाभार्थी ठरले असून, २० कोटी ८१ लाख ९८ हजार ४१० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे..प्रोत्साहनपर अनुदाननियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. कारणामुळे हे शेतकरी पात्र असतानाही कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यापासून वंचित राहिले आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली उपनिबंधक कार्यालयाकडून लाभार्थी शेतकऱ्यांचा पाठपुरावा करून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे अद्ययावत करण्याची सूचना करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.