Agriculture Research : नावीन्यपूर्ण संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी पुढे यावे

राष्ट्रीय कृषी विकास योजनाच्‍या माध्यमातून रफ्तार ही योजना शासनाकडून राबविली जात आहे.
Parbhani News
Parbhani NewsAgrowon

Parbhani News : कृषी व्‍यवसायामध्‍ये (Agricultural) नावीन्यपूर्ण संशोधनात्‍मक (Agriculture Research) बाबींचा वापर होणे आवश्‍यक आहे. त्याकरिता कृषी शास्‍त्रज्ञांना (Agricultural Scientists) पुढे यावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMAU Parbhani) आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत (Indian Council of Agricultural Research) मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सिरकॉट) यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. १७) शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी यांच्याकरिता सिनर्जी ऑफ इनोव्हेशन अँड इनक्युबेशन (नावीन्यपूर्ण व उष्मायन यातील समन्वय) यावरील तांत्रिक चर्चासत्रात ते बोलत होते.

या वेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोककुमार भरीमल्ला, कृषी अभियंता डॉ. ज्योती ढाकणे आणि कृषी अभियंता डॉ. मनोज कुमार महावार कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Parbhani News
Agriculture Machinery : परभणी कृषी विद्यापीठाकडून लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे विकसित

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की राष्ट्रीय कृषी विकास योजनाच्‍या माध्यमातून रफ्तार ही योजना शासनाकडून राबविली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना बळ देऊन उत्पन्नाची जोखीम कमी करणे आणि कृषी उद्योजकतेला चालना देण्यासह शेती व्यवसाय किफायतशीर करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

कौशल्य विकास आणि अर्थसाह्याद्वारे नवकल्पना आणि कृषी-उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी यात इनक्युबेटीस केंद्र उभारणीस साह्य केले जाते.

या योजनेकरिता मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही नोडल संस्था असून, या उपक्रमांचा शेतकरी, विद्यार्थी व युवा शेतकरी यांनी लाभ घ्‍यावा. या वेळी सिरकॉटच्या तज्ज्ञांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधील विविध योजनेबद्दल माहिती दिली.

या अंतर्गत नावीन्यपूर्ण संशोधनात्मक बाबींसाठी अनुदानाकरिता अर्ज सादर करण्‍याबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रात नॅनो सल्फर (गंधक) या विषयावर शास्त्रज्ञांसाठी तांत्रिक सत्रात मार्गदर्शन करण्‍यात आले.

Parbhani News
Tur Market : परभणी बाजार समितीत तूर प्रतिक्विंटल ६००० ते ६५०० रुपये

आयोजक विभाग प्रमुख (कृषिविद्या) डॉ. वासुदेव नारखेडे व विभाग प्रमुख (मृदाशास्त्र विभाग) डॉ. प्रवीण वैद्य हे होते. सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले, तर आभार डॉ. सुनीता पवार यांनी मानले. चर्चासत्रास विद्यार्थी, शेतकरी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com