Soil Productivity: शेतीमध्ये सातत्याने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे. ही स्थिती टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे यांनी केले..कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), सोलापूरतर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे ‘राष्ट्रीय जनजागृती अभियान’अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गटांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. .Nutrient Management: अन्नद्रव्ये व्यवस्थापनात विद्राव्य खतांचे महत्त्व.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. तांबडे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, मंडळ कृषी अधिकारी के. एम. लादे, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत दुपारगुडे, निंबर्गीचे पोलीस पाटील सिद्रामप्पा बिराजदार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सदानंद जाधव, निंबर्गी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष गंगाधर बिराजदार, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी अशोक राठोड आदी उपस्थित होते. डॉ. तांबडे म्हणाले, की जमिनीतील क्षारांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी आणि रासायनिक खतांची परिणामकारकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवाणू खतांसह ‘जिप्सम’ या भू-सुधारकाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. .Integrated Nutrient Management: जमीन आरोग्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक: डॉ. संग्राम काळे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे यांनी शेतकऱ्यांना खत वापराबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी केवळ ठराविक कंपन्यांच्या खतांचा आग्रह धरू नये. बाजारात विविध पर्याय उपलब्ध आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खते ही पिकाला द्यायची असतात, जमिनीला नाही, याचे भान शेतकऱ्यांनी ठेवले पाहिजे.’’.तांत्रिक सत्रातून मार्गदर्शनयावेळी विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. अमोल शास्त्री यांनी ऊसासारख्या बहुवार्षिक पिकांमध्ये नत्रयुक्त (युरिया) खतांवरील वाढता खर्च कमी करण्यासाठी ‘अॅसिटोबॅक्टर’ या जीवाणू खताचा वापर फायदेशीर ठरतो, असे सांगितले. प्रदीप गोंजारी यांनी खतांच्या वापरातील बदल, आधुनिक काळातील संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी शासनाच्या ‘जलतारा’ योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.