Agriculture Progress : शेतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब हाच प्रगतीचा मार्ग

Farm Technology : शेती हा गावांचा कणा आहे. भारतातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
Agriculture Progress
Agriculture Progress Agrowon
Published on
Updated on

Solapur News : शेती हा गावांचा कणा आहे. भारतातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी मशागतीसाठी यंत्रे वापरत नाहीत, त्यामुळे जमिनीचे प्रतियुनिट उत्पादनही कमी आहे. त्यामुळे शेतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराने प्रचंड प्रगती करावी लागेल, अशी अपेक्षा पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी व्यक्त केली.

एन. बी. नवले सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये तीनदिवसीय राष्ट्रीयस्तरावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दृकश्राव्य माध्यमातून पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. ए महानवर उपस्थिती होते. त्या वेळी डॉ. भोजे बोलत होते.

या वेळी सिंहगडचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, सिंहगड सीआरटीडीचे संशोधक संचालक डॉ. एस. एच. पवार, प्राचार्य डॉ. शंकर नवले, डॉ. राजीव जोशी (कर्नाटक केंद्रीय विद्यापीठ, गुलबर्गा), राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. नीलेश गायकवाड, सोलापूर विद्यापीठाचे डॉ. बी. जे. लोखंडे, सिंहगडचे उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, डॉ. रवींद्र व्यवहारे यांची उपस्थिती होती‌. या वेळी राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल (RGSTC) प्रकल्पाचा शुभारंभ कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते झाला.

पद्मश्री भोजे म्हणाले, की शेतीत खते आणि कीटकनाशकांचा वापर जास्त होतो आहे, ही चिंतेची बाब आहे. यामुळे लोकांचे आरोग्य बिघडते आहे, तसेच कर्करोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शेतीत मार्केटिंगचेही व्यवस्थापन करावे लागेल. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मध संकलन, मत्स्यपालन, ऊर्जा शेती, कुटीर उद्योग आणि सेवा याद्वारे आपण शेतीला पूरक बनवायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Agriculture Progress
Opposition Progressive Parties : 'मोदी हटाव एकच लक्ष्य', प्रागतीक पक्षांनी बांधली मोट

डॉ. मराठे म्हणाले, की २०२४७ मध्ये विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी युवा, गरीब, महिला व शेतकरी या चार महत्त्वपूर्ण स्तंभाच्या भागीदारी आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तरुणांना शेती क्षेत्रात विपुल संधी आहेत. त्यांनी वैज्ञानिक शेतीची कास धरून कृषी आधारित उद्योग केले पाहिजेत.

Agriculture Progress
Women Progress : श्रमबलातील वाढता स्त्री सहभाग

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. महानवर यांनी या वेळी ऊर्जा प्रभातफेरीत वापरलेल्या इलेक्ट्रिकल वाहनाचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. शशिकांत हिप्परगी यांनी, तर आभार वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. नीलेश गायकवाड यांनी मानले.

शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेसह व्याख्याने, निबंध स्पर्धा

या तीनदिवसीय कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, शोध प्रबंधाचे सादरीकरण, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्‍नमंजूषा, विज्ञान प्रदर्शन, संशोधकांशी थेट संवाद, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, नव उद्योजकांसाठी मार्गदर्शन असे भरगच्च कार्यक्रम होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com