Sarthi Scholarship : ‘सारथी’च्या गुणवंतांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Student Scholarships : छत्रपत्ती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांकडून महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
Sarthi Scholarship
Sarthi ScholarshipAgrowon
Published on
Updated on

Nashik News : छत्रपत्ती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांकडून महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षाकरिता रिक्त जागांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३० जानेवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक येथील सारथी विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीय संचालक सुधीर खांदे यांनी केले आहे.

Sarthi Scholarship
Education Scholarship : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती

ज्या विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाकरिता ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’अंतर्गत २०० च्या आत रँकिंग असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे. परदेशामध्ये शिक्षणासाठी एका वर्षामध्ये दोनदा प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी ‘सारथी’तर्फे ७५ जागांसाठी जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये ३१ जागांसाठी अर्ज प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी संधी देण्यात आली आहे.

Sarthi Scholarship
Agriculture Scholarship : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांसाठी शिष्यवृत्ती

...असे आहेत निकष

अर्जदार मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील असावा.

परदेशी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या पदवी परीक्षेत कमीत कमी ५५ टक्के गुण मिळालेले असावेत.

उमेदवार व उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.

उमेदवाराच्या पालकांचे कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्यांचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील (२०२३-२४) एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे.

इच्छुक उमेदवारांनी https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा.

ऑनलाइन भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, प्रमाणपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रती पडताळणीसाठी, सारथी मुख्यालयास सादर करावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com