Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

Abdul Sattar : फळ, फुलांच्या प्रदर्शनासाठी सत्तार युरोप दौऱ्यावर

Latest Agriculture News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांनी परदेश दौरे टाळावेत, अशा सूचना दिल्या असल्या तरी पणन मंत्री अब्दुल सत्तार हे फळ आणि फुलांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहण्यासाठी ११ दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जाणार आहेत.

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांनी परदेश दौरे टाळावेत, अशा सूचना दिल्या असल्या तरी पणन मंत्री अब्दुल सत्तार हे फळ आणि फुलांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहण्यासाठी ११ दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जाणार आहेत.

६ ते १५ फेब्रुवारी दरम्यान पणन महामंडळाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ते दौऱ्यावर निघाले असून जर्मनी, नेदरलँड, स्वित्झर्लंड अशा देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा खर्च पणन महामंडळ करणार आहे.

मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या खर्चावरून शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मंत्र्यांनी परदेश दौरे टाळावेत असे आदेश दिले होते. मात्र, यंदाचा दावोस दौरा वेगळ्याच कारणांनी गाजला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असलेले अनेक अधिकारी आणि आजी माजी खासदार यांचा लवाजमा हा चर्चेचा विषय ठरला होता.

आदित्य ठाकरे यांनी पुन्हा टीका केल्यानंतर दौऱ्यात बदल करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून जो अधिकारी गेला तो मुलुंड येथील एका संस्थेत कार्यरत असून सध्या मुख्यमंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असल्याचे समजते. मुळात मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी असे पद नाही तरीही संबंधित अधिकाऱ्याचे त्याच्या मूळ गावी मोठी पोस्टर्स लागली यावरून वादंग सुरू आहे.

दरम्यान, आता सत्तार यांनी युरोप दौरा काढला आहे. जर्मनीच्या बर्लिन शहरात ७ ते ९ फेब्रुवारी या काळात फ्रूट लाँजीस्टिका’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात जगातील मोठ्या कंपन्या सहभागी होतात. या प्रदर्शनामुळे उत्पादक कंपन्यांना जागतिक व्यापारपेठ खुली होते. त्यामुळे ते या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

Abdul Sattar
Agriculture Sector : कृषी क्षेत्राकडे गंभीर दुर्लक्ष

सत्तार हे बर्लिनवरून अँमस्टरडँमला पुढे जाणार आहेत. या ठिकाणी रॉयल फ्लोरा हॉलंड व अलस्मीर मार्केटला भेट देणार आहेत. या ठिकाणी फुलांची बाजारपेठ आहे. त्यानंतर स्विर्झर्लँडमधील झुरिकमध्ये फुले, फळभाज्यांच्या आयातदारांची बैठक होत आहे. त्यानंतर लिंबूवर्गीय फळांवर प्रक्रिया सामग्री उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे.

त्यानंतर झुरिकच्या सुपरमार्केटला भेट दिल्यानंतर पुन्हा मुंबईत परतणार आहेत. ६ ते १५ फेब्रुवारी या काळातील या संपूर्ण दौऱ्यात विमान प्रवास, व्हिसा, वास्तव्याचा खर्च पणन मंडळ करणार आहे. सत्तार यांच्यासह महामहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, निर्यात व्यवस्थापक सतीश वराडे हे देखील सहभागी होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com