Satara Rain
Satara Rainagrowon

Satara Rain : सातारा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेबरोबर, पुढचे ५ दिवस वादळी पावसाची शक्यता

Stormy Rain : वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
Published on

Satara Rain : सातारा जिल्ह्यात यंदा वळीव पावसाने अनेक तालुक्यात दिलासा दिला आहे. दरम्यान पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे. पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

मागील १० ते १२ दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत वादळी पाऊस होत आहे. हवामान विभागाने आणखी पुढील पाच दिवस जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने उद्या (मंगळवारी) साताऱ्यासह कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, खंडाळ्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असल्याची माहिती दिली आहे. बुधवारी आणि गुरुवारीही जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

दरम्यान, वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा असली, तरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मॉन्सूनने दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात प्रगती केली आहे, तर अंदमानात दाखल झालेला मॉन्सून यंदा ३१ मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे; पण पूर्व मोसमी पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला.

Satara Rain
Satara Sugarcane Season : सातारा जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाचा पडला पट्टा, १७ साखर कारखान्यांचे भरघोस उत्पादन

कोरेगाव तालुक्यात जोरदार पाऊस

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेचे काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शाळेचे असलेले पत्रेच या पावसात उडून गेले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही पण पावसाने शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सातारा बस स्थानकात देखील पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

आनेवाडीत होर्डिंग कोसळले

आनेवाडी टोल नाक्यासह भुईंज ते लिंब फाटा परिसरात धोकदायक होर्डिंग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाले. साेमवारी संध्याकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व पडत असलेल्या मुसळधार पावसाने मोठे होर्डींग अचानक कोसळल्याने वाहतूक काही काळ मंदावली होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com