Nashik News: सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून पुन्हा सरपंचांचीच नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी (ता. ४) दिले. या आदेशानुसार, जिल्ह्यातील ५८४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांच्या हाती गावगाडा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..फेब्रुवारी २०२६ अखेर जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतीमधील लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. या ठिकाणी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया राबवली जात असताना, ‘सरपंच परिषदेने’ सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने आदेश जारी करत सरपंचांना अधिकार देण्याचे निर्देश दिले..Book Village: पाच वर्षांपासून गोंदियात ‘पुस्तकांचे गाव’ उपेक्षितच.या आदेशानुसार इतर काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आधीच राबविण्यात आली होती; मात्र नाशिक जिल्ह्यात ती प्रलंबित होती. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी बुधवार (ता. ४) रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले..या निर्णयामुळे ५८४ ठिकाणी सरपंचांना अधिकार बहाल करण्यात आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आदेशानंतर माजी सरपंचांना पुन्हा एकदा कारभार सांभाळण्याची संधी मिळाली आहे..Village Irrigation Development: एकीच्या बळातून मिळविली सिंचन शाश्वती.२६ ठिकाणी तांत्रिक अडचणग्रामपंचायत प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करताना प्रशासनाने त्यांची पार्श्वभूमी तपासली आहे. ज्या सरपंचांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे किंवा ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत अथवा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा ठिकाणी सरपंचांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अशा २६ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांचीच नियुक्ती कायम राहणार आहे..जानेवारीपूर्वीच्या ग्रामपंचायतींमध्येही बदल होणार?जानेवारी २०२६ अखेर जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, या नियुक्तीला सरपंच परिषदेने हरकत घेतली आहे. या संदर्भात राज्य शासनाने नवीन आदेश जारी केल्यास, त्या ठिकाणीही माजी सरपंचांना संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र सध्या तरी यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.