Sangola APMC Election : सांगोला बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी

सांगोला विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात पक्षापेक्षा नेत्याच्या गटावरच निवडणुकीचे प्राबल्य जाणवत आहे.
 Election
ElectionAgrowon

Sangola News : सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची (Sangola Agricultural Produce Market Committee Election) प्रक्रिया सुरू झाली आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल मोठी असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी शेकाप विरोधात आजी-माजी आमदार दंड थोपटणार की? सूतगिरणी, खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक सर्व पक्षांच्या सहमतीने बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगोला विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात पक्षापेक्षा नेत्याच्या गटावरच निवडणुकीचे प्राबल्य जाणवत आहे. बराच काळ स्थगित झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे पडघम सध्या वाजू लागले आहे.

 Election
Nandurbar APMC Election : तळोदा बाजार समितीच्या सुधारित मतदारयादीमुळे चुरस वाढणार

या अगोदर सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी व खरेदी विक्री संघाची निवडणूक सर्वच पक्षांच्या सहमतीने बिनविरोध झाली होती. सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने निवडणूक बिनविरोध केली असली तरी आपले प्राबल्य ठेवले आहे.

परंतु सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथील प्रत्येक आठवड्याला होणारा जनावरांचा मोठा बाजार व इतर व्यवसायातून मोठी उलाढाल होत असते. त्यामुळे या निवडणुकीवर सर्वच पक्षांचा डोळा लागून राहिला आहे.

गेल्या दोन सहकारी संस्था बिनविरोध झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचे जास्त लक्ष लागून राहिले आहे.

बाजार समितीतील मतदार

सोसायटी मतदारसंघ १०४९, ग्रामपंचायत मतदारसंघ ८३३, व्यापारी मतदारसंघ २५४, हमाल मतदारसंघ ४७, असे २१८३ मतदार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com