Vegetable Farming: उन्हाच्या तीव्र झळा आणि पावसाने दिलेली ओढ अशा दुहेरी संकटामुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रोपवाटिकांमध्ये तयार असलेली रोपे खरेदी करण्यासही शेतकरी धजावत नसल्याने भाजीपाला लागवड जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी यंदा भाजीपाला क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरवर्षी जून महिन्यात लागवडीच्या कामांनी गजबजून जाणारे शेतशिवार यंदा मात्र ओस पडल्याचे चित्र दिसत आहे..सांगली जिल्ह्यातील वारणा व कृष्णा नदीकाठच्या सुपीक पट्ट्यासह दुष्काळी भागातील अनेक शेतकरी वर्षभर भाजीपाला पिकांची लागवड करतात. प्रामुख्याने टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी आणि कोथिंबीर या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अनेक अडचणी घेऊन आला आहे..Vegetable Cultivation: फळे, भाजीपाला पीक लागवडीत वाढ.मार्चपासूनच तापमानाचा पारा चढू लागल्याने उष्णतेच्या तीव्र झळा पिकांवर बसल्या. वाढत्या तापमानामुळे पिकांची अपेक्षित वाढ खुंटली, तर पाण्याची मागणीही वाढली. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच पाणीटंचाईचे संकट गडद होत गेले. उपलब्ध पाण्याचे नियोजन करत शेतकऱ्यांनी पिके वाचविण्याचा प्रयत्न केला..याच काळात टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी उपसा सिंचन योजनांची आवर्तने सुरू होती. मात्र धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने ही आवर्तनेही बंद करण्यात आली. त्यामुळे सिंचनासाठी उपलब्ध पाण्यावर आणखी मर्यादा आल्या..शेतकऱ्यांना पूर्वमोसमी पावसाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आकाशात ढगांची वर्दळ दिसूनही पावसाने हुलकावणी दिली. उष्णतेचा तडाखा कायम राहिल्याने नदी-नाले कोरडे पडू लागले, तर नदीपात्रांतील पाणीसाठा झपाट्याने घटला. विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांची पातळीही खालावली. त्यामुळे नव्याने लागवड केलेल्या पिकांना पुरेसे पाणी देता येईल का, याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. परिणामी रोपवाटिकांमध्ये तयार असलेली रोपे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे..Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार.शेतशिवारातील लगबग थांबलीदरवर्षी जून महिना सुरू होताच शेतशिवारात लागवडीची लगबग सुरू होते. शेतकरी आणि मजुरांची धावपळ, विविध शेतांमध्ये सुरू असलेली लागवड आणि नव्या हंगामाची चाहूल असे उत्साही चित्र पाहायला मिळते. मात्र यंदा अति उष्णता आणि पावसाच्या दिरंगाईमुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. लागवडीच्या प्रतीक्षेत असलेली शेतं ओस पडली असून, नेहमीच्या गजबजलेल्या वातावरणाऐवजी चिंतेचे सावट पसरले आहे..पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे रोपांच्या मागणीत सुमारे ८० टक्के घट झाली आहे. शेतकऱ्यांनी तयार करून ठेवलेली रोपे घेणेही थांबवले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर नवीन भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात कमी होईल.– प्रकाश कदम, प्रविराम कृषी परिवार.आमच्या भागात योजनेचे पाणी आल्याने काही प्रमाणात आधार मिळाला. मात्र वाढती उष्णता आणि पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याची नवीन लागवड थांबवली आहे. आता पावसाचीच प्रतीक्षा आहे.– राहुल कदम, भाजीपाला उत्पादक शेतकरी, भूड (ता. विटा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.