Sangli Sugarcane Rate : सांगलीत ऊस दरावरून संघर्ष! साखर कारखान्याच्या गव्हाणीत कार्यकर्त्यांनी घेतल्या उड्या

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना कांटा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
Sangli Sugarcane Rate
Sangli Sugarcane Rateagrowon

Sangli Sugarcane Protest : सांगली जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्यावरून कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना कांटा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर आज स्वाभिमानीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या थेट गव्हाणीत उड्या घेत कारखाना बंद पाडला.

यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत जोरदार झटापट झाली परंतु स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कारखान्यातील गव्हाणीत उड्या घेतल्या. यावेळी काही काळ वातावरण अत्यंत तणावाचे बनले होते. कारखानदारांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.

यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भागवत जाधव, संदीप राजोबा, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

दरम्यान काल झालेल्या बोरगाव येथील सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनीही इशारा दिला होता. सांगली जिल्ह्यातील बहुतांश कारखान्याचे वाढीव दर देण्याची मानसिकता आहे; परंतु जयंत पाटील यांचा त्यांच्यावर दबाव आहे अशी माहिती आम्हाला सर्वांनी दिली आहे त्यामुळे त्यांच्याच कारखान्यावर काटा बंद आंदोलनाची सुरवात असेल असे शेट्टी म्हणाले होते.

Sangli Sugarcane Rate
Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न चिघळणार, राजू शेट्टींचा जयंत पाटलांवर गंभीर आरोप

राजारामबापू कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ५७ कोटी रुपयांचा हिशेब द्यावा, इतर राजू शेट्टी कारखाने ज्यादा दर देण्याच्या तयारीत असताना जयंत पाटील त्यांच्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

राजारामबापू कारखान्याच्या चार युनिटने मिळून मागील हंगामात १७ लाख टनाचे गाळप केले त्यांच्याकडे ३१ मार्च अखेर ११ लाख ५३ हजार क्विंटल साखर शिल्लक होती. त्यावेळच्या साखरेच्या मूल्यांकन दराप्रमाणे ३३६० रुपये प्रति क्विंटल इतके होते. एक एप्रिलनंतर साखरेच्या दरात पुन्हा वाढ झाली. जवळपास ३६६० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेली. क्विंटलला तब्बल ३०० रुपये त्यांना जादा मिळाले आहेत. ही रक्कम जवळपास ५७ कोटी रुपये इतकी होते. त्यातील फक्त शंभर रुपये टनाला आम्ही मागत आहोत हा आमचा गुन्हा काय असेही शेट्टी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com