Sugarcane Cultivation Update: सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीचे नियोजन करू लागला आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १९ हजार ४५६ हेक्टरवर आडसाली हंगामातील उसाची लागवड झाली असून, वाळवा तालुक्यात सर्वाधिक लागवड झाली आहे..जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या परिसरात मे महिन्याच्या मध्यापासून आडसाली हंगामातील आगाप लागवड केली जाते. मात्र, यंदा मे महिन्यात पूर्वमॉन्सून पावसाने दडी मारली. त्यातच जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीला अडथळे निर्माण झाले. ज्या भागात अपेक्षित पाऊस आणि पाण्याची उपलब्धता होती, त्या भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरू केली; मात्र, त्याला फारशी गती नव्हती. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता..Sangli Sowing Update: सांगलीत खरिपाचा २८ टक्के पेरा.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजाला दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचे नियोजन सुरू केले. रोवाटिकांमधून रोपांची खरेदी सुरू झाल्याने लागवडीस गती आली. गेल्या पंधरा दिवसांत काही काळ पावसाचा खंड पडला होता. मात्र, वाफसा आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले. वाळवा तालुक्यात सर्वाधिक आडसाली हंगामातील उसाची लागवड होते. यंदाही या तालुक्यात सर्वाधिक लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे..Sugarcane Cultivation Delayed: सांगली जिल्ह्यातील आडसाली ऊस लागवड खोळंबली.आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि जत या दुष्काळी भागांत प्रामुख्याने पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड केली जाते. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आडसाली हंगामातील उसाचे क्षेत्र तुलनेने कमी असते. .मात्र, यंदा खानापूर तालुक्यात आडसाली हंगामातील ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या तालुक्यातील क्षेत्रात वाढ होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे जत तालुक्यात यंदा पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने आडसाली हंगामातील उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.