Sangali News: टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील पिकांचे या वर्षीपासून सॅटेलाइट सर्वेक्षण होणार आहे. सॅटेलाइट ईमेजच्या आधारे केलेल्या पीकनोंदींच्या आधारे पाणीपट्टी निश्चित केली जाणार आहे. त्याबाबत आलेल्या तक्रारींचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा केला जाईल. या बदलाने पाणी वापराच्या नोंदी नेमकेपणाने होतील आणि पाणीपट्टी वसुलीचा टक्का वाढेल, अशी जलसंपदा विभागाला अपेक्षा आहे..या वर्षी कोयना, वारणा, धोम, कण्हेर, उरमोडी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. परिणामी, सिंचन योजनांसाठी यंदा पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करता येणार आहे. जानेवारी ते मेअखेर योजना प्रभावीपणे चालवता येणे शक्य आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली..Satellite Mapping: अतिक्रमण शोधण्यासाठी उपग्रह मॅपिंगचा आधार घ्या.उपसा सिंचन योजनांच्या आवर्तनासाठी पाटबंधारे विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या तिन्ही योजनांचे सर्व पंप दुरुस्त करण्यात आले आहेत. ३० पैकी २९ पंप उपशासाठी सज्ज आहेत. काही ठिकाणी दरड कोसळली होती, शिंदेवाडीत गळती झाली होती. ती कामे अंतिम टप्प्यात आहेत. जतला अस्तरीकरणाचे काम ७० टक्के झाले आहे. पुलाची कामेही पूर्णत्वाला येत आहेत. त्यामुळे आवर्तनात अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी पाणी मागणीसाठी सात नंबरचा अर्ज भरून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे..पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न गंभीरटेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न अद्याप गंभीर आहे. किमान योजनांच्या वीजबिलापुरती तरी पाणीपट्टी वसूल व्हावी, असा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. टेंभू योजनेचे वीजबिल सुमारे ५५ ते ६० कोटी, म्हैसाळ योजनेचे सुमारे ५० कोटी, तर ताकारी योजनेचे वीजबिल सुमारे १५ कोटी रुपये इतके येते..National Security Satellites: भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी दहा उपग्रह : डॉ. व्ही. नारायणन.कुठून किती पाणी?कोयना धरण ४२.७० टीएमसीवारणा धरण ११.५ टीएमसीकण्हेर-उरमोडी ३.८३ टीएमसी.धरणे शंभर टक्के भरली असल्याने यंदा सिंचन योजनांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी मागणी नोंदवावी व अर्ज भरावेत, असे आवाहन केले आहे. जानेवारीपासून नियमित आवर्तन सुरू होईल. त्यासाठी पाटबंधारे विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.- चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.