Dairy Farmers: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय सांगली-कोल्हापूर दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. त्यानुसार गाईच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू झाला असल्याची माहिती संस्थेचे सदस्य अमरसिंह देशमुख यांनी दिली. .३१ जुलै रोजी संघाची सभा पार पडली. या सभेत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा सखोल विचार करून हा निर्णय एकमताने घेण्यात आला..Onion Price Issue: अपेक्षा ‘ए’ ग्रेड कांद्याची, दाम मात्र ‘मातीमोल’; केंद्र सरकारच्या घोषणेमुळे कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ.ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, दुग्ध व्यवसाय अधिक शाश्वत व सक्षम करणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या दरवाढीमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले..Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळ दूध दरात २ रुपयांची वाढ.अमरसिंह देशमुख म्हणाले, ‘‘दूध उत्पादकांना त्यांच्या घामाचा योग्य व न्याय्य मोबदला मिळावा, यासाठी संघटनेतील सर्व सदस्यांनी एकत्र येत ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.’’.दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे (सांगली-कोल्हापूर)सदस्य तथा बाबासाहेब देशमुख संघाचे (आटपाडी) अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी या निर्णयाची अधिकृत माहिती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.