Ahilyanagar News: गावरान ज्वारीच्या हुरड्याबाबत नेवाशातील खडका फाटा येथील शेतकऱ्यांनी ‘गल्ली ते दिल्ली’ हा शब्दप्रयोग प्रत्यक्षात उतरवून दाखविला आहे. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात मकर संक्रांतीच्या निमित्ताने झालेल्या तीन दिवसीय संक्रांत मेळाव्यात तब्बल २८० किलो हुरडा, चटण्या व अन्य पदार्थांवर दिल्लीकरांच्या उड्या पडल्या. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील चवदार हुरडा अशा प्रकारे दिल्लीच्या गारठ्यातही उबदार ठरला आहे..नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे आयोजित संक्रांत खाद्यसंस्कृती मेळाव्याकरिता आलेल्या अर्जांतून जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी खडका फाटा येथील विशाल व सतीश भांगे या बंधूंच्या गुरुकृपा हुरडा पार्टीची निवड केली होती..Jowar Hurda Prices: ज्वारी चार, तर हुरडा ४० हजार रुपये क्विंटल.गोविंदबाग (बारामती) भीमथडी यात्रा(पुणे), महालक्ष्मी सरस (मुंबई) येथील अनुभव आपल्याला दिल्लीत उपयोगी पडला, अशी प्रतिक्रिया भांगे यांनी दिली. महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला, अभिनेते भरत जाधव, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, उद्योजक अतुल बोकरीया यांनी हुरड्याचा आस्वाद घेतला. अनेक दिल्लीकरांनी कच्चा हुरडा आपल्या घरी नेला. अहिल्यानगरला हा मान मिळाल्याने शेतकऱ्यांना ही बाब प्रोत्साहन देणारी आहे, मत बोराळे यांनी व्यक्त केले.....असा होता बेत९ ते ११ जानेवारी २०२६ या तीन दिवसांत दिल्ली, महाराष्ट्र व अन्य राज्यांतून आलेल्या व्यक्तींनी हुरडा आणि वांग्याचे भरीत, बाजरीची भाकर, ठेचा, उसाचा रस, मक्याचे कणीस, हरभऱ्याचा टहाळ, पुरणपोळी, पिठले-भाकरी, तसेच गोडी शेव, रेवडी, फुटाणे, पोंगापंडित खाण्याचा मनसोक्त आनंद लुटला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.