Tur Rate : तूरडाळ, तांदळाच्या दरात सुधारणा

Rice Market : तूरडाळ प्रतिकिलो सरासरी १८० रुपये; तांदूळदरात दोन रुपयांनी वाढ
Tur Rate
Tur RateAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Tur Rice Market : नागपूर ः डाळींच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले आहे. तरी भाववाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घाऊक बाजारात देखील तुरीचे दर बारा हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही तेजी नोंदविली जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी तुरीच्या डाळीचा सरासरी दर १७५ रुपये होता. तो आता १८० रुपयांवर गेला आहे. महिनाअखेरीस तूर डाळ २०० रुपये दराचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याशिवाय तांदळाच्या दरातही वाढ झालेली आहे. तांदूळ दर प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढले आहेत. एक किलो तांदळाचे दर पूर्वी ६० रुपये होते. ते आता ६२ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तसेच ५० रुपये किलो असलेल्या तांदळाचे दर ५२ रुपयांवर पोहेचले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर मात्र, सर्वच जिनसांच्या दरात तेजी राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारात आवक आणि मागणी यात तफावत असल्याने दरात सातत्याने वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. कच्चा तुरीचा विचार करता विदर्भात तुरीचे दर बारा हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. संततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे तुरीचा दाणा अपेक्षित प्रमाणात भरला नाही. त्यामुळे तुरीचे दर दबावत होते. आता मात्र आवकच कमी झाल्याने असेल त्या दर्जाची तूर घेण्यावर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे.

Tur Rate
Tur Market Rate : हिंगोली बाजार समितीत तुरीच्या दरात सुधारणा

चणा, हरभरा डाळीच्या दरात सुधारणा
तूरडाळीच्याच दरात नव्हे तर मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळींच्या दरातदेखील सुधारणा झाली आहे.

साठ्यावर निर्बंध
डाळींच्या वाढत्या किमतींमुळे सरकार चिंतेत आहे. सध्या निवडणुकांचा मौसम असल्याने ग्राहक नाराज होऊ नये याकरिता केंद्र सरकारकडून जर नियंत्रण राहावे याकरिता प्रयत्न होत आहेत. त्यामुळे डाळींच्या वाढत्या किमती पाहता केंद्र सरकारकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, कोणीही एका महिन्यापेक्षा जास्त काळ डाळीचा साठा करून ठेऊ शकत नाही.

जर कोणी असे केले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच डाळींच्या आयातीवर देखील कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. तरीही भाववाढ सुरू असल्याने सरकारचा बाजारावरील अंकुश सुटल्याचे बोलले जात आहे. शासनस्तरावर देखील यामुळे अस्वस्थता वाढली आहे. दुसरीकडे विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर बारा हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. यापुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com