Kharif Crop Insurance Scheme: सुधारित खरीप पीकविमा योजना जाहीर -अर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत
Maharashtra Agriculture Insurance:‘एल निनो’मुळे यंदा कमी पावसाचे सावट असल्याने पीकविमा योजनेतील वगळलेले सर्व ट्रिगर लागू करण्याची मागणी होत असताना सरकारने शेवटी यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामात गेल्या वर्षीप्रमाणेच केवळ उत्पादकतेवर आधारित म्हणजेच हंगामात एकदाच पीकविमा भरपाई देणारी योजनाच राबविण्याचा निर्णय घेतला आहे.