Khandesh Rain : खानदेशात पावसाचे पुनरागमन

Khandesh Monsoon Update : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर खानदेशात आज पुन्हा पावसाचे आगमन झाले.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी (ता. १८) पुन्हा पावसाचे आगमन झाले. पेरण्या ९२ टक्क्यांवर खानदेशात झाल्या आहेत. पूर्वहंगामी कापूस, केळी पिकातील तणनियंत्रण, आंतरमशागत, खते देणे, फवारणीची कामे शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांत गतीने केली आहेत.

Rain
Khandesh Rain : खानदेशात सरासरीच्या २५ टक्के पाऊस

जोरदार पावसाची गरज आहे. जूनमध्ये पाऊस नव्हता. जुलैमध्ये ६ तारखेपासून अनेक भागांत पाऊस आला. ९ व १० जुलै रोजी अनेक भागांत बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यात सतत पावसाची रिपरिप सुरू होती. जोरदार पाऊस फक्त सातपुडालगत झाला. रिपरिप पावसात तण वाढत गेले. तणामुळे कापूस पिकाची वाढ खुंटण्याची स्थिती तयार झाली.

तणनियंत्रणासाठी हवा तसा वाफसा अनेक भागात नव्हता. तापी, गिरणा, पांझरा, अनेर, सुसरी, गोमाई, वाघूर आदी नदीकाठच्या, लाभक्षेत्राच्या भागात काळ्या कसदार जमिनीत वाफसा अनेक दिवस नव्हता. पण पावसाने उघडीप दिल्याने आंतरमशाग, तण नियंत्रणास वेग आला. फक्त हलक्या व मध्यम जमिनीत वाफसा नाहीसा झाला. यामुळे पिकांवर ताण येत होता.

पावसाची गरज होती. आता पुन्हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण मागील २४ तासात कुठेही जोरदार, मध्यम पाऊस झालेला नाही. सध्या तणनियंत्रणाचे काम बंद करावे लागेल. पण शेतकरी अशा स्थितीत तण वाढू नये यासाठी तणनाशकांचा उपयोग कापूस पिकात करतील, असे दिसत आहे. कारण मजूरटंचाईमुळे अनेकांची तणनियंत्रणाची कामे होऊ शकली नाहीत.

पावसाचा खंड असताना केळी पिकातही अनावश्यक पाने, फुटवे कापून बागा स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच पूर्वहंगामी कापूस पिकात किडनाशके व संप्रेरकांची फवारणी काहींनी हाती घेतली होती. जळगावातील एरंडोल, धरणगाव, चोपडा, जळगाव, यावल, रावेर, भुसावळ, जळगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार आदी सर्वच भागांत शुक्रवारी काही तास हलका पाऊस झाला.

शनिवारी (ता.१९) सकाळीच काही भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतीकामांचे नियोजन कोलमडले. पुढे सतत पाऊस सुरू राहिल्यास शेतीकामे ठप्प होतील. यामुळे जोरदार पावसाची गरज आहे. जोरदार पावसानंतर काही दिवस उघडीप हवी आहे. अन्यथा, सततच्या पावसात यंदा तणनाशकांचा वापरही वाढेल. परिणामी, उत्पादन खर्च अधिक होईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com