Krushi Seva Kendra Strike : कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बंदला नाशिक जिल्ह्यात प्रतिसाद

Krushi Seva Kendra Strike in Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळण्यासाठी नवे कायदे आणले जात आहेत. मात्र या प्रस्तावित कायद्यांना तीव्र विरोध होत आहे. यासाठी राज्यव्यापी बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाले आहेत.
krushi seva kendra
krushi seva kendra Agrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळण्यासाठी नवे कायदे आणले जात आहेत. मात्र या प्रस्तावित कायद्यांना तीव्र विरोध होत आहे. प्रस्तावित विधेयकातील जाचक नियमाविरुद्ध तसेच प्रस्तावित पाचही कायदे रद्द करावेत, या मागण्यांसाठी गुरुवारपासून (ता. २) शनिवारपर्यंत (ता. ४) पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाले आहेत. गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यातील विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळाला.

महाराष्ट्र सिड्स, फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या लाक्षणिक बंदला नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. याबाबत विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांना ‘नाडा’चे पदाधिकारी अरुण मुळाणे, मंगेश तांबट, रामभाऊ जाधव, संजय हिरावत, विजय खैरनार, महेंद्र सराफ, बाळासाहेब शिरसाठ, दीपक मालपूरे, संदीप वाणी आदींनी निवेदन दिले. जिल्ह्यात नाशिक, निफाड, दिंडोरी, सटाणासह इतर तालुक्यांत प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

krushi seva kendra
Agriculture Input Act : कृषी निविष्ठा कायदे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू

राज्य सरकारच्या कृषी विभागाने प्रास्तावित विधेयक कायदा क्रमांक ४०,४१,४२,४३, व ४४ मध्ये बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके विक्रेत्यांवर जाचक अटी लादल्या आहेत. त्या संदर्भात कृषी विभागाला स्वतंत्र निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे हे प्रस्तावित कायदे रद्द व्हावेत, अशी मागणी आहे.

krushi seva kendra
Maize Sowing : रब्बीत शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल
शासकीय मान्यताप्राप्त निविष्ठा उत्पादनासंबंधी गुणवत्तेबाबत अडचणी असल्यास उत्पादकाला जबाबदार धरावे. विक्रेत्याचा संबंध नसल्याने त्यास जबाबदार धरू नये. नवीन कायद्यांमुळे विक्रेत्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची खात्री द्यावी. विक्रेत्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय याबाबतच्या कायद्यास अंतिम स्वरूप देऊ नये.
अरुण मुळाणे, अध्यक्ष-नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशन
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र शासनाचे नवीन कायदे अडचणीत आणणारे आहेत. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी आहोत.
दीपक भालेराव, संचालक-निफाड ॲग्रो डीलर्स असोशिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com