Wardha News : वर्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय (Office of Agricultural Officer) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (Agriculture Technology Management) यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने धान्य व मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत खरेदीदार आणि विक्रेते संमलन घेण्यात आले.
या संमेलनात तमिळनाडू राज्यातील भाजीपाला, डाळ आणि मसाले निर्यातदार संजीव मोहन, आंध्र प्रदेशातील विजय के.पी. तसेच नागपूर येथील निर्यातदार अन्नछत्र इंटरनॅशनलचे संचालक विश्वजित रघाटाटे तसेच वर्धा पीएमएफएमईचे योजनेचे लाभार्थी उद्योजक राजेंद्र व रोहन कावळे यांनी सहभाग घेतला होता.
गहू, कणिक, डाळी यांना सुद्धा काही आशियाई देशांमध्ये मागणी असून त्याकरिता शेतकऱ्यांनी त्या देशांच्या मागणीनुसार क्लिनिंग आणि ग्रेडिंग करून धान्य विक्री करणे आवश्यक आहे. ते जर बरोबर केले गेले नाही तर आपल्याला भाव मिळत नाही असे सांगितले.
राष्ट्रीय स्तरावर दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, चेन्नई येथे वायगाव हळद आणि गहु कणिक यांची मागणी आहे. आपण आपल्या शेतकऱ्यांना या शहरांमध्ये सुद्धा विक्रीची संधी उपलब्ध करून देऊ शकतो.
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे लाभार्थी उद्योजक विलास हिवंज, सेलू काटे, प्रमोद दरणे, हिंगणघाट, महेंद्र टेकाडे तळेगाव, (शा.प.), संदीप सोनटक्के सिंधी रेल्वे, सुमीत बनकर, कारंजा, विकेश नगराळे, शेगाव (कुंड),
किशोर बर्डे देवळी, कार्तिक केळझरकर, सुनील सोनटक्के वाघोली, हरिदास महाजन, समुद्रपूर इत्यादी संमेलनाच्या चर्चेत सहभागी झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.