Rehabilitation Rights : वर्धा सेलू तालुक्यातील परसोडी येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, संपादनापूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या व अडचणींचे निराकरण करून जमिनीचा योग्य व न्याय्य मोबदला द्यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे..परसोडी परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाबाबतच्या अडचणी आणि मागण्या खासदार काळे यांच्यासमोर मांडल्या. जिल्ह्यात यापूर्वी विविध महामार्गांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात शेतीचे संपादन झाले आहे. त्यामुळे पिकाऊ, विशेषतः कापूस लागवडीखालील क्षेत्र कमी होत असताना आता औद्योगिक वसाहतीसाठीही शेती संपादित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे..Interview with MPKV Former Vice-Chancellor Dr. Rajaram Deshmukh : जल, मृदा संधारण, योग्य वाणांची निवड ठरणार महत्त्वाची....जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी औद्योगिक वसाहती आवश्यक असल्या, तरी त्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्कांवर परिणाम होऊ नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. जमीन संपादनाच्या प्रक्रियेत कोणताही दबाव आणू नये. प्रशासनाने शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या मागण्या, अडचणी आणि अपेक्षा समजून घ्याव्यात. त्यानंतर वाटाघाटीतून संपादनाची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली..Smart Farming: शेतीव्यवस्था असेल स्मार्ट अन् शाश्वत.शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत खासदार अमर काळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र दिले आहे. परसोडी येथील जमीन संपादनाची कार्यवाही पुढे नेण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडवावेत. तसेच संपादित जमिनीचा योग्य मोबदला देतानाच शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवावेत आणि त्यानंतरच जमीन संपादनाची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे..‘शेतीच गेली तर शेतकरी काय करणार?’ असा प्रश्न या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शेती हेच प्रमुख उपजीविकेचे साधन असलेल्या कुटुंबांचे भविष्यातील उत्पन्न आणि उपजीविका लक्षात घेऊन जमीन संपादनाची प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.