निंबळकला ‘हर घर जल,हर घर पेड’चा ठराव मंजूर

सार्वजनिक ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांना ते वृक्ष दत्तक देण्यात येतील. दत्तक वृक्षांवर संबंधित कुटुंबाचे नाव टाकण्यात येईल.
Tree Plantation
Tree PlantationAgrowon
Published on
Updated on

नगरः निंबळक गावाच्या ग्रामसभेत ‘हर घर जल, हर घर पेड’ या उपक्रमाचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रत्येक घरी पाणी त्याचप्रमाणे आता प्रत्येक घरी झाड लावण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. सार्वजनिक ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांना ते वृक्ष दत्तक देण्यात येतील. दत्तक वृक्षांवर संबंधित कुटुंबाचे नाव टाकण्यात येईल.

जिल्हा परिषदेचे सदस्य माधवराव लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच प्रियांका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत झाली. कोरोनानंतर प्रथमच झालेल्या या ग्रामसभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढून घेण्याचे आवाहन केले. अतिक्रमण काढले नाही, तर शासनाच्या नियमाप्रमाणे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

जल जीवन मिशनमध्ये सहभागी होऊन पाण्याचे नियोजन करण्याचे ठरले. घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, सुधारित दराने करआकारणी, आमदार नीलेश लंके, तसेच जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या निधीतून झालेली विकासकामे, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबविणे यावर सभेत चर्चा झाली. विधवा महिलांचा सन्मान अबाधित राहण्यासाठी अनिष्ट प्रथा बंद करून त्यांना समाजात मान प्राप्त करून देण्याचा महत्त्वपूर्ण ठरावदेखील ग्रामसभेत घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com