Hyderabad News: तूर पिकातील महत्त्वाच्या व गंभीर असलेल्या स्टरिलिटी मोझॅक (सीएमडी) या रोगाला प्रतिकारक जनुकाचा शोध लावण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. ‘जिनॉमिक्स’ शाखेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संशोधनात झाला आहे. या यशामुळे सीएमडी रोगाला प्रतिकारक विविध जाती विकसित करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवणे शक्य होणार आहे. .‘इक्रिसॅट’ व ‘आयसीएआर’ या संस्थांच्या भागीदारीतून हे संशोधनकार्य घडले आहे. स्टरिलिटी मोझॅक (सीएमडी) हा तुरीवरील महत्त्वाचा रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे सुमारे ९० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. तूर उत्पादकांना त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते..Tur Sowing : तूर लागवड किंचित वाढली.हीच गंभीर बाब लक्षात घेऊन अत्याधुनिक पीकपैदास तंत्रज्ञान कार्यक्रमातून त्यावर उपाय शोधण्याचे काम शास्त्रज्ञ करीत होते. इक्रिसॅट संस्थेचा जिनॉमिक्स, प्री ब्रीडिंग व बायो इन्फॉमॅटिक्स विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत (आयसीएआर) भारतीय डाळवर्गीय संशोधन संस्था (उत्तर प्रदेश), डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ (बिहार) आणि भारतीय कृषी संशोधन संस्था (आसाम) यांनी भागीदारीत हे संशोधन कार्य केले आहे..तुरीच्या ‘आशा’ वाणातून मिळाले जनुकस्टरिलिटी मोझॅक रोगाला ‘सीसीसएमडीझिरोफोर’ (Ccsmd04) हे जनुक प्रतिकारक असल्याचा निष्कर्ष या संशोधन कार्यक्रमातील शास्त्रज्ञांनी काढला आहे. इक्रिसॅट संस्थेनेच विकसित केलेल्या ‘आशा’ (आयसीपीएल ८७११९) या सर्वाधिक लागवड होणाऱ्या लोकप्रिय वाणातूनच या जनुकाचा शोध लागला आहे..त्यासाठी जिनॉमिक्स, पिनॉमिक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उच्च क्षमतेच्या संगणकीय विश्लेषण तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला. सीएमडी रोगाला उच्च प्रतिकार करण्याची क्षमता या जनुकात आहे. या संशोधनाामुळे भारतातच नव्हे तर आशियायी देशांमध्ये तुरीच्या अधिक प्रतिकारक्षम जाती विकसित करून शाश्वत उत्पादन घेण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत..Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण.कडधान्य स्वयंपूर्णतेला चालनातुरीचे प्रतिकारक वाण विकसित करण्याचा संशोधन कार्यक्रम इक्रिसॅट १९७५ पासून राबवत आहे. तुरीतील विषाणूजन्य रोग व वाहक कोळी यामध्ये भिन्नता आढळल्याने काही वाणांना प्रत्यक्ष शेतात मर्यादित यश मिळाले. ताज्या संशोधन अभ्यासात एसएमडी रोगाला प्रतिकारक ‘आशा’ व रोगाला बळी पडणाऱ्या ‘मारुती’ या दोन वाणांच्या जिनोमिक्सचा संदर्भ वापरण्यात आला आहे..तुरीच्या अन्य जंगली वाणांमधून अजून काही प्रतिकारक जनुके शोधण्यासाठी देखील संशोधकांची ही टीम सज्ज झाली आहे. विविध संस्थांच्या भागीदारीतूनच संशोधन जलदगतीने पुढे नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यातूनच भारताला डाळवर्गीय उद्योगात स्वयंपूर्णता मिळवून देणे शक्य होणार आहे, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे..गाठले महत्त्वपूर्ण शिखरइक्रिसॅट संस्थेचे जिनॉमिक्स, प्री ब्रीडिंग व बायो इन्फॉमॅटिक्स विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मनीष के. पांडे म्हणाले, की या संशोधन कार्यक्रमातून जनुकांसंबंधीची नवी माहिती उजेडात आली आहे. त्याआधारे ‘जनुकीय एडिटिंग’ तंत्रज्ञानाला चालना देणे व त्यायोगे जनुकीय सुधारणा घडवून आणणे शक्य होणार आहे. तर एसएमडी रोगाचे गांभीर्य किंवा व्याप्ती पाहता इक्रिसॅट व ‘आयसीएआर’ च्या शास्त्रज्ञांनी संशोधनात एक महत्त्वपूर्ण शिखर गाठले आहे. या संशोधनामुळे तुरीच्या अधिकाधिक प्रतिकारक जाती विकसित करणे शक्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी दिली आहे..इक्रिसॅटच्या संशोधन आणि नवोन्मेष विभागाचे उपसंचालक डॉ. स्टॅनफोर्ड ब्लेड म्हणाले, की ‘आयसीएआर’ संस्थेसोबत असलेल्या दीर्घकालीन भागीदारीचे मूल्य आम्ही जाणतो. या संशोधन कार्यक्रमासाठी सीजीआयएआर आणि गेट्स फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. त्यांचेही आभार मानणे गरजेचे आहे. इक्रिसॅटच्या या ‘जिनोमिक्स’ आणि ‘प्री ब्रीडिंग’ कार्यक्रमातून घडणाऱ्या संशोधनाद्वारे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास प्राधान्य देण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.