Mango Flower-Bugs Research : आंबा बागेत फूलकिडे नियंत्रणावर संशोधन

Mango Production : आंबा बागेतून चांगले उत्पादन मिळावे यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केलेल्या तंत्राचा वापर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बागेत करण्यात येणार आहे.
Mango flowering
Mango flowering Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : आंबा बागेतून चांगले उत्पादन मिळावे यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केलेल्या तंत्राचा वापर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बागेत करण्यात येणार आहे. तसेच फूलकिडीच्या नियंत्रणासाठी आवश्यक संशोधनही केले जाणार आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील दोन बागांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाकडून त्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

फुलकिडीचा प्रादुर्भाव आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दरवर्षी बागायतदारांचे मोठे नुकसान होते. त्यावर खात्रीशीर उपाययोजना करण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घेऊन संशोधन करावे, अशी मागणी दापोली येथे झालेल्या बैठकीत आंबा बागायतदारांनी केली होती. त्या वेळी विद्यापीठाकडून संशोधनासाठी बाग उपलब्ध करून द्या, आम्ही नियोजन करतो, असे सांगण्यात आले,

Mango flowering
Sugarcane Rate Farmer : ऊस दराच्या मुद्दावर कारखानदारांची गट्टी तर शेतकरी चळवळींनीही आवळली मुठ्ठी, संघर्ष अटळ!

आंबा बागांचे योग्य व्यवस्थापन केले तर त्यामधून दर्जेदार उत्पादन घेता येते, असेही सूचवले होते. विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब करण्यासाठी रत्नागिरीतील आंबा बागायतदार प्रकाश साळवी यांनी तयारी दर्शविली. त्यांनी गोळप येथील १२० कलमांची बाग विद्यापीठाच्या शिफारशीनुसार संशोधनासाठी उपलब्ध करून दिली. तसेच दुसरी १६४ कलमांची बाग फूलकिडे नियंत्रण प्रयोगासाठी उपलब्ध करून दिली आहे.

कृषी विद्यापीठातर्फे कीटकशास्त्रज्ञ डॉ. वानखेडे हे या बागेमध्ये संशोधन करणार आहेत. फूलकिडे आटोक्यात आणण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. कृषी विभागाकडून विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फवारण्या करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे. या हंगामासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात त्याचा निश्‍चितच बागायतदारांना फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Mango flowering
Rabi Season : परतीच्या पाऊस नसल्याने रब्बी पिकावर मोठा परिणाम, राज्यात फक्त २८ टक्के पेरण्या

पुढील सहा महिन्यांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी दर दोन दिवसांनी भेट देणार आहेत. त्या बागांमध्ये होणारे बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव याच्या नोंदी ठेवतील. त्यानुसार उपाययोजनाही केल्या जाणार आहेत. सध्या बागेतील काही कलमांना कणी आलेली आहे. ती जपण्यासाठी आवश्यक फवारण्या केल्या आहेत.

कृषी विद्यापीठाकडून आंबा बागेमध्ये पाच फवारण्यांची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पहिली फवारणी बागेत झालेली आहे. पुढील फवारण्यांचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. त्याचे परिणाम सकारात्मक असतील.
सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी
कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाला दोन आंबा बागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामधून यंदाच्या हंगामात चांगले उत्पादन मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.
प्रकाश साळवी, गोळप

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com